फोटो सौजन्य - Social Media
लग्नानंतर मात्र त्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढल्याचं ती सांगते. “ती आता फक्त माझी आई नाही, तर माझी सगळ्यात जवळची मैत्रीण बनली आहे,” असे दीप्तीने सांगितले. तिच्याकडूनच जिद्द आणि चिकाटी हे गुण मिळाल्याचंही ती आवर्जून म्हणाली.
दीप्तीच्या मते, तिच्या आईला स्वतःच्या हाताने स्वादिष्ट पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालायला खूप आवडतं. विशेष म्हणजे हाच गुण स्वतःमध्येही आल्याचं ती हसत सांगते. घरातील प्रेम, जिव्हाळा आणि आईच्या स्वभावाचा प्रभाव तिच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसून येतो. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर आईने तिचा पाठिंबा दिला. आजही Mi Sansar Maza Rekhite ही मालिका पाहताना आई तिच्या छोट्या चुका आवर्जून सांगते. “आईच्या सूचनांमुळे प्रत्येक वेळी अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते,” असं दीप्तीने सांगितलं. या छोट्या गोष्टींमधून त्यांच्यातील खास आणि क्युट बॉण्ड अधोरेखित होताना दिसतो.
आईसोबत खास वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त करत दीप्ती म्हणाली की, तिला आईसोबत एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जायचं आहे. विशेषतः हिमाचलसारख्या निसर्गरम्य ठिकाणी ‘माय-लेकींची ट्रिप’ करण्याचं तिचं स्वप्न असून ती ट्रिप लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास Dipti Ketkar हिने व्यक्त केला.






