फोटो सौजन्य - Social Media
मात्र या नात्याचा प्रवास सोपा नव्हता. प्रवीण यांनी नोकरी सोडून नाटकाची वाट निवडल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. स्थिर उत्पन्न नसणे, स्वतःचे घर नसणे आणि दोघांच्या वयातील १२ वर्षांचे अंतर या कारणांमुळे स्नेहल यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला या विवाहाला विरोध केला होता. त्या दिवसांत नाटकांच्या प्रयोगांसाठी प्रवीण आणि स्नेहल अनेकदा दुचाकीवरून प्रवास करत असत. प्रवीण यांची कला आणि स्वप्नांप्रती असलेली निष्ठा पाहून स्नेहल यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यांची साथ सोडली नाही. परिस्थिती बदलण्यासाठी प्रवीण यांनी मुंबईत दूरचित्रवाणी मालिकांच्या लेखनाचे कामही केले. ‘अग्निहोत्र’ आणि ‘असंभव’सारख्या मालिकांसाठी त्यांनी पडद्यामागे लेखन केले, मात्र त्याचे श्रेय त्यांनी कधीच घेतले नाही.
अनेक अडथळ्यांवर मात करत प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘धर्मवीर’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांना दिग्दर्शक म्हणून मोठी ओळख मिळवून दिली. या संपूर्ण प्रवासात स्नेहल यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांना सातत्याने पाठिंबा दिला. सध्या ‘देऊळ बंद २’च्या यशाचा आनंद घेत असलेले प्रवीण तरडे आता त्यांच्या पुढील प्रकल्प ‘मुळशी पॅटर्न’च्या कामात व्यस्त होणार आहेत. येत्या डिसेंबरमध्ये प्रवीण आणि स्नेहल यांच्या वैवाहिक सहजीवनाला १७ वर्षे पूर्ण होणार असून, त्यांची संघर्षातून यशाकडे झालेली वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.






