फोटो सौजन्य - Social Media
काय घडलं?
कमळीला अभ्यासात टफ देण्यासाठी महाविद्यालयात एका मुलीची एंट्री झाली होती. अभ्यासात हुशार असलेल्या त्या मुलीने कमळीला अभ्यासात फेल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण तिचे प्रयत्न काही सतमार्गी लागले नाहीत. अशामध्ये कमळीने जिद्दीने कष्ट घेत अभ्यास करून महाविद्यालयात बाजी मारली. मुंबई विद्यापीठात तिने पहिला क्रमांक मिळवला. हे कळताच, कमळी तिच्या गावाकडे निघाली. गावात गावकऱ्यांकडून तिची मिरवणूक काढण्यात आली. पण, त्या उत्साहामध्ये कमळीच्या नजरेआड एक बातमी आली. तिच्या समोर तिच्या आजोबांच्या पुण्यस्मरणाचे पोस्टर होते. कमळीला तिचे आजोबा गेल्याचे माहीत नव्हते. या धक्क्यातून कमळी सावरेनाशी होते.
गेल्या काही भागांमध्ये कमळीचे ठरलेले लग्न मोडले. अनिकाची आजी आणि आई तर नेहमीच कमळीच्या जीवावर उठले असतात. अनिकाच्या आजीला कमळीचे सत्य माहिती असते. या सगळ्यागोष्टींना मात करत अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या कमळीने अभ्यासात विजय तर मिळवला परंतु पाठीवर पडणारी आजोबांची कौतुकाची थाप गमावली.
कमळी मालिका आणि बरंच काही…
‘कमळी’ (Kamali) ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय मालिका आहे. ३० जून २०२५ रोजी सुरू झालेल्या या मालिकेत विजया बाबर (कमळी) आणि निखिल दामले (हृषी) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही एक कौटुंबिक आणि भावनिक ड्रामा मालिका आहे. उच्च शिक्षणासाठी गावातून शहरात आलेल्या कमळीचा संघर्ष, तिचे हृषीवरील प्रेम आणि तिची सावत्र बहीण अनिका हिच्यासोबत होणारे तिचे मतभेद यावर मालिकेची कथा आधारलेली आहे.






