फोटो सौजन्य - Social Media
संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी दिली. Sankarshan Karhade ने जेष्ठ मराठी अभिनेते Ashok Saraf यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट ती आनंदाची बातमी देण्यामागचा केवळ निमित्त आहे. संकर्षणने पोस्टखाली कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “द ग्रेट अशोक सरांसोबत मी काम केलं तर; आम्हाला दोघांना एकत्रं पहायला आवडेल का हो तुम्हाला…??? आधी तुम्ही खरं सांगा… मग मी तुम्हाला सगळं खरं खरं काय ते सांगतो…”. याचार्थ दोघेही नट नव्या प्रोजेक्टखाली एकत्र झळकणार आहेत. तसेच दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत याची विचारणा संकर्षणने पोस्टच्या माध्यमातून केली आहे. मुळात, खरी बातमी त्याने नमूद केलेल्या “#new #project #comingsoon #with #legend” या Hashtags मधून कळून येत आहे.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
काय आहेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया?
सिनेरसिकांना अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडेच्या आगामी प्रोजेक्टसाठी भरभरून उत्सुकता दाखवली आहे. एका सिनेचाहत्याचे म्हणणे आहे की “हो! त्यात प्रशांत दामले असतील तर आणखीन मज्जा वाढेल”, तर दुसऱ्या चाहत्याने “हो नक्कीच! दोन हिरे एका मंचावर म्हणजे भरपूर मज्जा” असे कमेंट केले आहेत. असे असंख्य कमेंट्स आणि शुभेच्छा दोघांच्या आगामी प्रोजेक्टसाठी मिळाले आहेत. “project काय असणार?, त्याचे नाव काय असणार?, ते कधी प्रदर्शित होणार?” असे असंख्य प्रश्न चाहत्यांना पडले आहेत, त्याची उत्तरे संकर्षण येत्या काही दिवसांत देईल.






