समृद्धी क्रिएशननं ‘उर्मी’ (Urmi Marathi Movie) चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. ‘उर्मी’ या चित्रपटाचा ट्रेलर (Urmi Trailer) नुकताच लाँच करण्यात आला. या चित्रपटात अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil), सायली संजीव (Sayali Sanjeev), अभिनेता चिन्मय उदगीरकर, नितीश चव्हाण, माधव अभ्यंकर, सायली पराडकर,तृप्ती देवरे , संतोष शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट असून ऋतुजा जुन्नरकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. डॉ. प्रवीण चौधरी चित्रपटाचे निर्माता, चैताली प्रवीण चौधरी सहनिर्माती आहेत. राजेश जाधव यांनी चित्रपटाचं पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. ‘उर्मी’ या चित्रपटात नाती, प्रामाणिकपणा, विश्वास, प्रेम, मैत्री हे बिंदू जोडत एक उत्तम कथा साकारली आहे. पती-पत्नी यांच्या नात्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे काय घडते ? असं चित्रपटाचं कथासूत्र आहे. ‘उर्मी’ हा चित्रपट 14 एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.