मेंदूची गंभीर दुखापत झालेल्या ४ वर्षीय चिमूरड्याला मिळाले जीवनदान
वैभवला जसलोकमध्ये आणण्यात आले तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. तसेच (ग्लासगो कोमा स्केल स्कोअर इ१व्ही१एम१ (E1V1M1), म्हणजेच बेशुद्ध आणि तीव्र वेदना होत असतानाही तो कोणताच प्रतिसाद देत नव्हता), त्याच्या डोक्याला इजा झाली होती आणि अनेक बाह्य जखमा दिसत होत्या. डॉ. सचना शेट्टी (आपत्कालीन विभागाच्या कन्सलटन्ट) आणि डॉ. सुनील जैन (हेड इमरजन्सी सर्विसेस) यांनी व यांच्यासोबत कार्यरत असलेल्या आपत्कालीन पथकाने त्वरित पेडियाट्रिक ट्रॉमा प्रोटोकॉल सुरू केला. त्यामध्ये मेरुदंड स्थिरीकरण, श्वसनमार्गाच्या व्यवस्थापनासाठी एंडोट्रॅकियल इंट्युबेशन आणि द्रव पुनर्प्राप्तीचा समावेश होता.
प्रारंभिक इमेजिंग आणि निदानात्मक आपत्कालीन इमेजिंगद्वारे वैभवला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले, ज्यामध्ये दोन्ही फुफ्फुसांमध्ये अनेक जखमा आणि मेंदूतील रक्तस्राव आणि डिफ्युज सेरेब्रल एडेमा यांच समावेश होता. अतिरिक्त जखमांमध्ये क्लॅव्हिकल, मँडिबल आणि पहिल्या बरगडीला फ्रॅक्चर, उजव्या बाजूचा न्यूमोथोरॅक्स यांचा समावेश होता, या सर्व गोष्टी मेंदू, मेरुदंड, छाती आणि पोटाच्या सीटी स्कॅनद्वारे निदर्शनात आल्या. त्याला डिफ्यूज्ड अॅक्सोनल इंज्युरी असल्याचाही संशय होता आणि नंतर एमआरआय ब्रेन रिपोर्ट्सद्वारे याची पुष्टी झाली.
मल्टीस्पेशालिटी व्यवस्थापनामध्ये बालरोग ट्रॉमा केअर, बालरोग न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी, बालरोग ऑर्थोपेडिक आणि बालरोग अतिदक्षता विभागाच्या सहभागाने एक व्यापक व्यवस्थापन योजना सुरू करण्यात आली. मुलाला आयव्ही द्रव, आयव्ही प्रतिजैविके, अँटीकन्ल्व्हसंट्स, इंट्राक्रॅनियल दाब व्यवस्थापनासाठी हायपरटोनिक सलाईन आणि सेडेटिव्ह अॅनाल्जेसिया देण्यात आले. एमआरआय निष्कर्षांमुळे नंतर ग्रेड ३ डीएआयच्या निदानाची पुष्टी झाली. फ्रॅक्चर झालेल्या क्लॅव्हिकलसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. ही शस्त्रक्रिया ऑर्थोपेडीक विभागाच्या डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील काही दिवसांत, वैभवमध्ये न्यूरोलॉजिकलदृष्ट्या चांगला बदल दिसून आला, त्याने त्याचे डोळे स्वतःहून उघडले आणि हात-पाय देखील तो हलवू लागला. त्याला यशस्वीरित्या एक्स्ट्युबेट करण्यात आले आणि त्याचा ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आला.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या अपघात आणि आपत्कालीन विभागाच्या कन्सलटन्ट डॉ. सचना शेट्टी यांनी सांगितले की, “वैभवला आणलं गेलं तेव्हा तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता, त्याच्या श्वसनमार्गात बिघाड झाल्याची लक्षणे दिसत होती. श्वसनमार्ग सुरक्षित करणे आणि रुग्णाला हेमोडायनामिकदृष्ट्या स्थिर करणे हे आमचे ध्येय होते. ट्रॉमा इमेजिंगद्वारे लवकर निदान झाल्याने पुढे कोणत्या प्रकारचा उपचार करायचा हे ओळखण्यात आणि अधिक गुंतागुंत टाळण्यात खूप मदत झाली.”
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या बालरोग विभागाचे कन्सल्टंट डॉ. शहला काझी यांनी सांगितले की, “वैभवची स्थिती अत्यंत गंभीर होती. त्याला त्वरित आयव्ही द्रव, आयव्ही प्रतिजैविके, अँटीकन्ल्व्हसंट्स, इंट्राक्रॅनियल दाब व्यवस्थापनासाठी औषधे आणि सेडेटिव्ह अॅनाल्जेसिया सुरू करण्यात आले. एमआरआय निष्कर्षांद्वारे नंतर ग्रेड ३ डीएआयचे निदान असल्याचे सुनिश्चित झाले, त्यामुळे वेळीच पेडियाट्रिक ट्रॉमा केअर, न्यूरोप्रोटेक्टिव्ह उपचार आणि सहाय्यक वैद्यकीय सेवा यामुळे न्यूरोलॉजिकल सिस्टीम स्थिर करण्यात मदत झाली. डॉ. शहनाज शेख यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी अशा अनेक सर्वसमावेशक उपचारांची सुरुवात झाली आणि नंतर जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील बालरोग न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनायता उदवाडिया हेगडे यांच्या तज्ज्ञ देखरेखीखाली निरंतर न्यूरोरिहॅबिलिटेशन आणि सखोल निरीक्षण यामुळे वैभवच्या तब्येतीत सुधारणा घडवण्याचा मार्ग मोकळा झाला.”
यावर भाष्य करताना जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे ऑर्थोपेडिक्स आणि शोल्डर सर्जन डॉ. अभिजीत सावदेकर म्हणाले, “वैभवला गंभीर डिस्प्लेस्ड क्लॅव्हिकल फ्रॅक्चर झाले होते व हाय वेलोसिटी ट्रॉमामुळे ब्रॅकियल प्लेक्ससला मार लागल्याची शक्यता होती. फ्रॅक्चर झालेल्या क्लॅव्हिकलचे टोक त्वचेच्या बाहेर दिसत होते, ज्यामुळे संभाव्य लिगामेंट आणि ब्रॅकियल प्लेक्सस दुखापत होण्याची शक्यता होती. जसलोक हॉस्पिटल येथे बालरोग अस्थिरोग तज्ञ डॉ. रूजूता मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली, हात व ब्रॅकियल प्लेक्ससचे विशेषज्ञ असलेले अस्थिरोग तज्ञ डॉ. किरण लडकत आणि मी अशा आमच्या पथकाने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. पॉलीट्रॉमाच्या बाबतीत तब्येतीत सुधारणा होण्याच्या प्रवासात उशीर होऊ नये म्हणून आणि सर्वोत्तम कार्यात्मक परिणाम मिळवण्यासाठी वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे होते. या शस्त्रक्रियेमध्ये अनेस्थेसियोलॉजीचे सल्लागार डॉ. अनुराज जैन यांनी सहकार्य केले.”
वैभवची आई रुबी मिश्रा यांनी आपल्या मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “माझ्या मुलाला अत्यंत गंभीर अवस्थेत आणले गेले होते, आणि त्याच्या जगण्याची कोणतीही आशा नव्हती. पण जसलोक हॉस्पिटल आणि इथल्या डॉक्टरांनी ज्या प्रकारे त्याच्यावर उपचार केले ते पाहिल्यानंतर मला असे वाटते की हा चमत्कार दुसऱ्या कोणत्याच हॉस्पिटलमध्ये घडला नसता.”
रुग्णाला हेमोडायनामिकदृष्ट्या स्थिर स्थितीत डिस्चार्ज करण्यात आले, आणि हळूहळू पण आशादायक न्यूरोलॉजिकल सुधारणा दिसून आली. कुटुंबाला आहार, औषधोपचार, घरात कशी काळजी घ्यायची आणि वैद्यकीय लक्ष देण्याची गरज याबबात परिपूर्ण माहिती देण्यात आली. दीर्घकाळ उपचार सुरु राहावेत म्हणून सतत फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






