(फोटो- सोशल मिडिया)
AIIMS नागपूर व महाराष्ट्र शासन यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
बालपणातील स्थूलता, टाइप-१ मधुमेह आणि आजारांचे प्रमाण वाढलेले
बालकांच्या आरोग्याला सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
मुंबई: भारतामध्ये बालपणातील स्थूलता, टाइप-१ मधुमेह आणि दमा यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे (NCDs) प्रमाण वाढत आहे. या आजारांची सुरुवात लहानपणी झाल्यास दीर्घकालीन आरोग्य आणि आर्थिक परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी आरोग्य भवन येथे एआयआयएमएस, नागपूर (AIIMS Nagpur) यांच्यासोबत सामंजस्य करार केला. या उपक्रमाला युनिसेफ महाराष्ट्रकडून धोरणात्मक आणि तांत्रिक सहाय्य मिळणार असून, बालपणातील असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनाला बळकटी देण्याचा उद्देश आहे. बालकांच्या आरोग्याला अधिक सक्षम करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हा करार मा. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मा. आमदार नाना पाटोले, तसेच राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी डॉ. निपुण विनायक, आयएएस, सचिव आरोग्य विभाग, डॉ. कादंबरी बालकवडे, आयएएस, आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य सेवा, मुंबई युनिसेफ महाराष्ट्र प्रमुख संजय सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
हा उपक्रम राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत बालकांमधील असंसर्ग्यजन्य आजारांसाठी एकात्मिक, शाश्वत व प्रणालीआधारित उपाययोजना राबविण्याचा पहिला व्यापक प्रयत्न आहे. एआयआयएमएस नागपूर हे मुख्य केंद्र म्हणून कार्य करणार असून युनिसेफमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल.
शरीरात ही ७ लक्षणे दिसली तर सावध व्हा! डायबिटीज होण्याची अफाट शक्यता
या करारांतर्गत:
* टाइप १ मधुमेह, दमा, स्थूलता, मानसिक आरोग्य, जन्मजात हृदयविकार व सिकल सेल आजार यांसाठी मानक उपचार प्रोटोकॉल विकसित करण्यात आले आहेत
* १० जिल्हा रुग्णालयांमध्ये बाल असंसर्गजन्य आजारांवर उपाययोजनेसाठी क्लिनिक्स सुरू करण्यात येणार आहेत
* आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण प्रमुख जिल्ह्यांमध्ये करण्यात येईल
* समुदाय स्तरावर तपासणी व संदर्भ प्रणाली मजबूत करण्यात येईल
डॉ. प्रशांत जोशी, कार्यकारी संचालक, एआयआयएमएस नागपूर यांनी या करारामुळे तज्ज्ञ वैद्यकीय ज्ञानाचे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी रूपांतर होईल, असे सांगितले.
मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
युनिसेफचे संजय सिंग यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत असून शासन, वैद्यकीय संस्था व तज्ज्ञ यांना एकत्र आणून बाल असंसर्गजन्य आजारांसाठी शाश्वत उपाय योजना सक्षमीकरण गरजेचे असल्याचे सांगितले.






