आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरूवात होत आहे. 12 वर्ष पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे.. लाभार्थ्यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारकडून 12 ते 14 या वयोगटातील लहान मुलांसाठी हे लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. Corbevax ही लस मुलांना दिली जाणार असून दोन डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असणार आहे. याबाबतीत गाईडलाईन्स सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. देशभरात 12 ते 14 वर्षातील 7.74 कोटी मुलं आहेत. यांच्या लसीकरणासाठी CoWIN अॅप वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ही लस सर्वांना मोफत दिली जाणार आहे.