आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर(फोटो-सोशल मीडिया)
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, अलीकडच्या काळात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनेही राज्यभर कॅन्सर तपासणी व उपचार मोहीम राबवली जात आहे. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर निर्मूलनासाठीचे चांगले काम सुरु आहे.
राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पॅकेजच्या दरामध्ये वाढ केली असून, अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. त्याचा कॅन्सर रुग्णांनाही फायदा होईल. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांना उपचार पश्चात सेवा द्यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून व टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या तांत्रिक सहकार्याने राज्यात 26 ठिकाणी डे – केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जिल्हास्तरावर त्यामुळे कॅन्सर रुग्णांना सेवा उपलब्ध होईल. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या भेटीत “डे केअर” तांत्रिक सहकार्य व प्रशिक्षण याबाबत चर्चा झाली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समावेश असलेल्या रुग्णालयांनी सेवा अधिक प्रभावी करण्यासंदर्भात काही सूचना असल्यास आरोग्य विभागाच्या अभ्यास गटाला द्याव्यात असे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
हेही वाचा : चेतेश्वर पुजाराच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर! घरातील सदस्याने केली आत्महत्या; नेमकं काय घडलं?






