ऋषभ पंत आणि केएल राहूळ(फोटो-सोशल मिडिया)
Ind vs Sa 2nd Test : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत भारतावर ४०८ धावांनी विजय मिळवला असून या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी खिशात टाकली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ५४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ १४० धावाच उभारू शकला. परिणामी भारताला ४०८ या मोठ्या फरकाने करू शकला. या पराभवासह भारतीय संघाल मालिका २-० ने गमवावी लागली. या मानहानिकरक पराभवासाठी नेमकं कोण जबाबदार आहेत? याबबदळ आपण जाणून घेऊया.
भारतीय संघ फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वोत्तम मनाला जात असे, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाज ढेपळताना दिसून आले. आता, विरोधी फलंदाज भारताच्या फलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना चांगलेच नाचवत आहेत. सेनुरन मुथुसामी आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या फलंदाजीने हे सिद्ध केले आहे.
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : भारताचा लाजिरवाणा पराभव! पंत आर्मीला 408 धावांनी धूळ चारत दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास
भारताच्या मालिकेतील पराभवाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर सर्वात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याला टीकच धनी व्हावे लागत आहे. न्यूझीलंडनंतर, भारताला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका गमवावी लागली. गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताची कसोटी कामगिरीचा आलेख घसरलेला दिसून आला. भारताला अधिक पराभवच पचवावे लागले. भारताचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अलिकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हा कामगिरीचा आलेख घसरलेला आहे. मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत भारताला ३-० असा व्हाईटवॉश पत्करावा लागला होता तर त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ३-१ असा पराभव पदरी पडला होता.
भारतीय संघाला कसोटी संघासाठी परिपूर्ण इलेव्हन निवडण्यात अपयश आले. सलग दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले. फलंदाजांच्या बाबत सांगायचे झाले तर, केएल राहुल आणि जयस्वाल दोघेही कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून अपयशी ठरले आहेत. प्रशिक्षक गंभीरने या मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये चार विशेषज्ञ फलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेतला तो चांगलाच फसला, एकालाही साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ध्रुव जुरेल आणि नितीश कुमार रेड्डी यांचा प्रभावीपणे वापर संघ अपयशी ठरल्याचे दिसून आले.
भारताला अद्याप क्रमांक ३ वर भरवशाचा फलंदाज मिळू शकलेला नाही. राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा या दोन फलंदाजांनंतर त्यांची जागा अद्याप कुणाला घेता आलेली नाही. क्रमांक ३ चा जास्त वापर केल्याने, या स्थानावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना संघातून वगळण्याची भीती अधिक वाटत होती. पहिल्या कसोटीत, वॉशिंग्टन सुंदरला क्रमांक ३ वर पाठवण्यात आले होते, तर साई सुदर्शनला अकरामधून बाहेर ठेवण्यात आले होते. दुसऱ्या कसोटीत सुंदरला ८ व्या क्रमांकावर पाठवण्यात आले आणि सुदर्शनला ३ व्या क्रमांकावर खेळवण्यात आले.तसेच भारतीय संघ व्यवस्थापनाला ७ व्या क्रमांकावर देखील कायमस्वरूपी फलंदाज सापडलेला नाही. शुभमन गिल, केएल राहुल, करुण नायर, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन या सर्वांना या स्थानावर खेळवण्यात आले पण यात भारताला यश आले नाही. यासोबतच ५ व्या क्रमांकाचे स्थान अनिश्चित राहिले आहे. कधी ऋषभ पंत, कधी ध्रुव जुरेल आणि कधी जडेजा या स्थानावर फलंदाजी करताना दिसून आले. त्यामुळे या स्थानावर कायमस्वरूपी फलंदाज मिळू शककेला नाही.
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : सुपरमॅन मार्को जॅन्सन पाहिलात का? आश्चर्यकारक झेल घेऊन लावले वेड; पहा व्हिडिओ
भारतीय संघ व्यवस्थापन घरच्या परिस्थितीत आणि अनुकूल खेळपट्ट्यांचा फायदा घेण्यास अपयशी ठरले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभव आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पराभवामुळे हे स्पष्ट खळे आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून, भारताने घरच्या मैदानावर खेळलेल्या नऊपैकी चार कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला.






