फोटो सौजन्य: Freepik
हल्ली जंक फूड खाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. जागोजागी आपल्याला असे छोटे छोटे स्टॉल्स दिसतील जे आपल्याला जंक फूड देतात. परंतु या सर्वात नागरिकांमध्ये देखील चांगल्या भाज्या आणि त्याचे फायदे याविषयी जागरूकता वाढत आहे. भाज्या खाल्ल्याने आरोग्याला असंख्य फायदे मिळतात कारण त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मिनरल्स,फायबर सारखे अनेक घटक असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचे कार्य सुधारण्यासाठी आवश्यक असतात.
भाजी घेताना एक प्रश्न नेहमीच आपल्या मनात येतो तो म्हणजे नेमक्या कुठल्या भाज्या या आपल्या आरोग्यासाठी जात उत्तम आहेत? तसं म्हणायला गेलं तर सर्वच प्रकारच्या भाज्या आपल्या शरीराला तंदुरुस्त बनवत असतात पण काही भाज्यांमध्ये पोषक तत्वांची मात्रा ही अधिकच असते. चला जाणून घेऊया अश्या कोणत्या भाज्या आहे ज्यामध्ये जास्त प्रोटीन आणि कॅल्शियम आहे.
ब्रोकोली: ब्रोकोलीमध्ये इतर अनेक भाज्यांपेक्षा प्रोटीन हे जास्त असते. एका मध्यम शिजवलेल्या देठात 4 ग्रॅम प्रोटीन असतात. तसेच या प्रत्येक देठात व्हिटॅमिन सी देखील असते, जे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे. हे वनस्पती स्त्रोतांमधून शोषलेल्या लोहाचे प्रमाण वाढवू शकते.
पालक: पालक ही सर्वात पोषक भाज्यांपैकी एक आहे. एक कप शिजवलेल्या पालकामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन आणि फक्त 49 कॅलरीज असतात. पालकमध्ये रोगाशी लढणारे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजेही मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.
वाटाणे: वाटाणे हे प्रोटीनचा एक चांगला स्रोत मानले जाते.170 ग्रॅम वाटाणे खाल्ल्याने शरीराला 12 ग्रॅम प्रोटीन मिळतात. तसेच यामध्ये भरपूर फायबर असते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, झिंक, लोह, मँगनीज, तांबे, पोटॅशियम आणि थायामिन सारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्याला वाटाण्यांमध्ये आढळतात.