हिमाचल प्रदेशमध्ये २५७ नागरिकांचा मृत्यू (फोटो- ani)
Himachal Pradesh: यावर्षी देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मान्सूनने देशभरात जोरदार बॅटिंग केली आहे. पर्वतीय राज्यामध्ये तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र यावर्षीचा पाऊस हिमाचल प्रदेशमध्ये थोडासा घातक ठरताना दिसून येत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये यावर्षीच्या पावसामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सरकारी आकड्यांनुसार पावसाळ्याच्या कालावधीत २५७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या मान्सूनमध्ये झालेल्या हानीबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे १३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर रस्ते अपघातात १२४ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. दोन्ही मिळून तब्बल २५७ नागरिकांचा मृत्यू हिमाचल प्रदेशमध्ये यंदाच्या मान्सून कालावधीत झाला आहे.
The monsoon havoc in Himachal Pradesh has claimed 257 lives since June 20, with 133 deaths reported in rain-related incidents such as landslides, flash floods, drowning, and electrocution, and another 124 fatalities in road accidents, according to the Himachal Pradesh State… pic.twitter.com/u1sk6Cp5ip
— ANI (@ANI) August 16, 2025
सरकारी अहवालानुसार सर्वात जास्त मृत्यू हे कांगडा जिल्ह्यात झाले आहेत. या ठिकाणी २८ नागरिकांचा बळी गेला आहे. मंडी जिल्ह्यात २६ तर हमीरपूरमध्ये १३ लोकांचा जीव गेला आहे. दरडी कोसळणे,फ्लॅश फ्लड, ढगफुटी, विजेचा शॉक लागणे, साप चावणे अशा घटनांमुळे झाला आहे. बुडून जीव जाणाऱ्यांची संख्या २७ आहे. अन्य कारणांमुळे २७ जणांचा बळी गेला आहे.
रस्ते अपघातात १२४ नागरिकांचा मृत्यू
नैसर्गिक आपत्तीबरोबरच हिमाचल प्रदेशमध्ये रस्ते अपघातात १२४ जणांचा मृत्यू झाला आहे. घटना घडलेल्या भागात बचावकार्य व मदतकार्य अत्यंत वेगाने करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पावसाचा जोर वाढला
गेले दोन ते तीन दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये अत्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस आहे. सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. उत्तराखंड, महाराष्ट्र, दक्षिण भारत अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. आज भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना कोणता अलर्ट दिला आहे ते जाणून घेऊयात.
Monsoon Alert: जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पावसाचा जोर वाढला: उत्तराखंडमध्ये तर…; चिपळूणमध्ये पाणी भरण्याची शक्यता
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश मध्ये पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. पर्वतीय राज्यांमध्ये सलग सुरु असलेल्या पावसाने अनेक रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आज व पुढील काही दिवस उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.