टाकळी हाजीत महिलेला कुऱ्हाड व फावड्याने मारहाण; 'त्या' महिला शेतात आल्या अन्... (File Photo)
झारखंडमध्ये एक भयावह आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आधी ५ अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं. त्यातील तीन मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील एका गावात घडली असून या घटनेनंतर झारखंडमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
खुंटीचे एसपी अमन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. रनिया परिसरातील एका लग्न समारंभातून ५ मुली घरी परतत होत्या. यावेळी काही अल्पवयीन मुले त्यांच्या मागावर होती. दरम्यान निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी पाचही मुलींचे अपहरण केलं आणि जबरदस्तीने टेकडीवर नेले. त्यातील २ मुलींनी त्यांच्या हाताचा चावा घेत तेथून पळ काढला. त्यामुळे त्या दोघी मुली त्यांच्या तावडीतून निसटल्या.
मात्र ३ मुली त्या मुलांच्या ताब्यात होत्या. यानंतर सर्व १८ आरोपींनी ३ मुलींवर सामूहिक बलात्कार केला आणि जंगलात सोडून पळ काढला. काही वेळानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलींना गावात आणलं. तिन्ही मुलींचे वय १२-१६ वर्षे असल्याची माहिती आहे. तर, आरोपी मुलांचे १७ आहे. पीडित मुलींच्या कुटुंबाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या सर्व अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली.
पीडित मुलींच्या तक्रारीवरून आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. पोलीस पथकाने सर्व आरोपी मुलांना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती एसपी अमन कुमार यांनी दिली.
नागपुरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या तरुण मुलीवरही लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाहीतर दोघींची मोबाईलद्वारे आक्षेपार्ह चित्रफित काढली. नंतर हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
आरोपी हा चालक आहे. पीडित महिला दोन मुलींसह जरीपटका परिसरात राहते. सुमारे 10 वर्षांपूर्वी पीडित महिलेची आरोपीसोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे लैंगिक शोषण करू लागला. दरम्यान, त्याने महिलेच्या 20 वर्षीय मुलीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचेही लैंगिक शोषण सुरू केले. मोबाईलने दोघींसोबतही केलेल्या कृत्याची चित्रफीतही काढली. ही चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन तो दोघींचे लैंगिक शोषण करत होता.