जीव वाचवण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेवरच काळाचा घाला, भीषण अपघातात गर्भवती महिलेसह ४ जणांना मृत्यू
उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. हौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाराणसी-शक्तिनगर मार्गावरील हनुमान घाटीनजीक ही दुर्घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले, तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Karad Accident : कराडमध्ये एका कारने तब्बल सात वाहनांना उडवले, जखमींचा आकडाही आला समोर
मिळालेल्या माहितीनुसार, हिरावती या गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी रुग्णवाहिकेतून वाराणसीला नेण्यात येत होते. तर सोनभद्र येथून खडीने भरलेला ट्रक वाराणसीच्या दिशेने निघाला होता. दरम्यान वाराणसी-शक्तिनगर मार्गावरील हनुमान घाटीनजीक या ट्रकने रुग्णवाहिकेला मागून धडक दिली. धडक इतकी जोराची होती ट्रक पलटी झाला. यात गर्भवती महिला हिरावती, सूरजबली खरवार, मालती देवी, रामू आणि एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघं गंभीर जखमी झाले आहेत.
कौशल कुमार खरवार आणि रुग्णवाहिका चालक भंडारी शर्मा गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना अहरौरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र अधिक उपचासाठी जखमींना वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात; अपघातात एकाच मृत्य तर…
चुनारचे उपजिल्हाधिकारी राजेश वर्मा यांनी सांगितले की, या अपघातात चार जणांचा मृत्यू आणि दोन जण गंभीर जखमी झाल्याची पुष्टी झाली आहे. जखमी चालक भंडारी शर्मा याने सांगितले की, ट्रकने रुग्णवाहिकेला मागून धडक दिली आणि रुग्णवाहिकेवर पलटी झाला. स्थानिक प्रशासनाने या घटनेच्या चौकशीला सुरुवात केली आहे.