फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, चार जणांचा मृत्यू, १८ जण होरपळले!

भरवारीच्या खलीलाबाद भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात घडली. आज सकाळच्या सुमारास कारखान्यात आग लागली.

    उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. कौशांबी येथील भारवारी परिसरातील वॉर्ड क्रमांक 23 मधील फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास स्फोट झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण होरपळले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर आग लागली. सध्या अग्निशमन दलाचे जवान मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

    नेमकं काय घडलं

    मिळालेल्या माहितीनुसार,  भरवारीच्या खलीलाबाद भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात घडली.  हा फटाका कारखाना खलीलाबाद येथील शराफत अलीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. शराफत अली हा न्यू रांगोळी फटाक्यांच्या नावाने फटाक्यांचा कारखाना चालवतो. आज सकाळच्या सुमारास कारखान्यात अचानक मोठा स्फोट  झाला. यावेळी फटाक्यांचे तुकडे कित्येक किलोमीटर दूर उडून गेले.

    घटनेची माहिती मिळताच एसपी ब्रिजेश श्रीवास्तव घटनास्थळी पोहोचले. अनेक रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.  अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.