लग्नातून परतणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला, गिट्टीनं भरलेला ट्रक स्कॅार्पिओवर उटलटा 6 जणांचा मृत्यू!

भागलपूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. NH 80 वर लग्नाच्या वरात वाहनावर महामार्ग उलटला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला.

    बिहार : बिहारमधून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. भागलपूरमध्ये लग्न आटोपून परतणाऱ्या पाहुण्यांच्या गाडीचा भीषण अपघात (Bihar Accident News) झाला. गिट्टीनं भरलेला ट्रक स्कॅार्पिओवर उलटून झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 मुलांचाही समावेशआहे. अपघातग्रस्त स्कॉर्पिओच्या पुढे आणि मागे असलेले आणखी दोन वाहनं रस्त्यावर निघून जाण्यात यशस्वी झाले. अन्यथा मृतांचा आकडा आणखी वाढू शकला असता.

    मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर येथील कहालगाव मुख्य रस्त्यावर NH-80 वर तेथे रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. घटनेच्या दिवशी गिट्टीनं भरलेला एक ट्रक या मार्गावरुन जात असताना तितक्यात लग्न आटोपून परतणाऱ्या पाहुण्यांची स्कॅार्पिओ यांचा अपघात झाला. गिट्टीने भरलेला ट्रक गाडीवर उलटला, त्यामुळे स्कॉर्पिओमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली सर्व जखमींना भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

    या घटनेची माहिती मिळताच घोघा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसीबी आणि NH-80 बांधकाम एजन्सीच्या इतर साधनांच्या साहाय्याने ढिगारा हटवण्यास सुरुवात केली आहे. येथे ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या 3 जणांना तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आले तर इतर 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. जखमींनी स्थानिकांना दिलेल्या माहितीनुसार, मुंगेरच्या हवेली खडगपूर येथील गोवाडा येथून पिरपेंटी येथील खिदमतपूरकडे लग्नाचे पाहुणे निघाले होते.