संग्रहित फोटो
नवी दिल्ली : शाळेतील विद्यार्थ्यांचे काही ना काही गोष्टी, किस्से सतत समोर येत असतात. त्यात कधी चांगलं तर कधी न पटणारं असं काही असू शकतं. पण एका विद्यार्थ्याने शाळेत असताना असं काही चित्र (Student Drawing) काढलं, त्यामुळे थेट पालकांची तातडीची मीटिंगच बोलवावी लागली.
सोशल मीडियावर एका व्यक्तीने पोस्ट केली. त्यामध्ये त्याने सांगितले की, ‘आमचा 6 वर्षांचा मुलगा शाळेतून घरी आला आणि आम्हाला एक चिठ्ठी दिली. त्यात लिहिले होते की, मला आणि माझ्या पत्नीला शिक्षिकांनी तातडीने शाळेत बोलावले आहे. त्यावर मी माझ्या मुलाला या मीटिंगचे कारण विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की, शिक्षकांना मी काढलेले चित्र आवडलं नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचलो तेव्हा शिक्षकांनी आम्हाला आमच्या मुलाने काढलेलं चित्र दाखवलं आणि म्हटलं, ‘मी तुमच्या मुलाला कुटुंबाचे चित्र काढायला सांगितले होते पण त्याने हे काढलं. तुम्ही त्याला काही तरी शिकवा’, असे विद्यार्थ्याचे शिक्षक पालकांना सांगत होते.
इमर्जन्सी मीटिंगची काय गरज ?
एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले की, ‘शिक्षकाची अशी जलद कृती जीव वाचवू शकते. दुसर्याने लिहिले की, ‘हा काय मूर्खपणा आहे, चित्रावर एवढ्या नाटकाची काय गरज होती. एका यूजरने लिहिले की, ‘हे कसले शिक्षक आहेत, मुलाच्या चित्रावर तातडीची बैठक घेण्याची काय गरज होती? या शिक्षकाने या मुलाला नीट ओळखले नसल्याचे दिसून येत आहे, असेही म्हटले आहे.