संग्रहित फोटो
मालदा : अत्यंत गरिबीने त्रस्त असलेल्या पश्चिम बंगालमधील मालदा येथील एका 20 वर्षीय महिलेने आपल्या 18 दिवसांच्या बाळाला दीड लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. मालदा येथील हरिश्चंद्रपूर येथे ही घटन उघडकीस आली. यानंतर हे मूल आईला परत करण्यात आले.
तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने मूल विकत घेतलेल्या व्यक्तीला पैसे परत केले नाहीत, तर महिलेला सुपूर्द केल्याचे समोर आले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या घटनेने गावात प्रचंड खळबळ माजली. शेवटी गावकऱ्यांच्या दबावानंतर टीएमसी नेत्याने बाळ विकत घेतलेल्या एका महिलेला 1.20 लाख रुपये परत केले आणि उर्वरित 30,000 रुपये 10 दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले.
आश्चर्य म्हणजे आतापर्यंत याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. स्थानिक उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित बीडीओला दिले आहेत.