भारतीय उद्योगपती आणि सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) सीईओ अदर पूनावाला (Aadar Poonawala) यांनी लंडनमध्ये महागडं घर खरेदी केलं आहे. अदर पूनावाला यांनी हे घरं 1444.4 कोटी रुपयांना विकत घेतलं. लंडनच्या हाइड पार्क परिसरात हे घरं असून ते तब्बल 100 वर्षांहून जुनं असल्याची माहिती समोर आली आहे. हे घरं या वर्षातील ही सर्वात महाग मालमत्ता खरेदी असल्याचे अहवालातुन समोर आलं आहे.
[read_also content=”ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे याचं निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! https://www.navarashtra.com/movies/ravindra-berde-passed-away-at-the-age-of-72-nrps-488426.html”]
रिपोर्ट नुसार, लडंनमधील पॅाश एरियामध्ये असलेलं हे घर 1920 मध्ये बांधण्यात आलं होतं. त्याची किंमत 138 दशलक्ष पौंड म्हणजेच 1444.4 कोटी रुपये आहे. लंडनमधील हे दुसरे सर्वात महागडे घर म्हणून ओळखलं जात आहे. तर लंडनमध्ये सध्या घरांची खरेदी-विक्री खूपच कमी झाली आहे. या खरेदीनंतर लंडनमधील गृहनिर्माण बाजाराला चालना मिळेल, असे मानले जात आहे. अदर पूनावाला कुटुंबाशी संबंधित लोकांनी सांगितले की, कुटुंबाचा सध्या लंडनला जाण्याचा कोणताही विचार नाही. मात्र, त्यांच कुटुंब लंडनला गेल्यावर या घरात मुक्काम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
I am pleased to announce that the WHO has recommended the R21/Matrix-M™️ Malaria vaccine. The combined efforts of @SerumInstIndia and @UniOfOxford have come to fruition. This will save thousands of lives in Africa afflicted by Malaria, and help bridge the vast gap between the…
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) October 3, 2023