फोटो- टीम नवराष्ट्र
सध्या देशभरात भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये देशाच्या तपास यंत्रणा या अनेक ठिकाणी छापेमारी करत असतात. अनेकांना मोठ्या चौकशीनंतर तपास यंत्रणा अटक देखील करतात. ईडीने आज दिल्लीत अधिक एक मोठी कारवाई केली आहे. ईडीने आज दिल्लीत आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक केली आहे. एका मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडी आज चौकशीसाठी अमानतुल्लाह खान यांच्या घरी दाखल झाली होती. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली आहे.
ईडीचे एक पथक आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरी दाखल झाले. ईडीचे पथक हे दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकडीसह दाखल झाले. दरम्यान जवळपास दोन अमानतुल्लाह खान यांनी आपल्या घराचे दरवाजे उघडले नाहीत असे समजते. त्यानंतर ईडीचे पथक चौकशीसाठी त्यांच्या घरात पोहोचले. तसेच ५ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अमानतुल्लाह खान यांना अटक केली आहे.
ईडीचे पथक घराबाहेर दाखल झाले होते तेव्हा, अमानतुल्लाह खान हे घरात ईडी आपल्याला अटक करण्यासाठी आली आहे याप्रकारचा एक व्हिडीओ करत असल्याचे समजते. तसेच त्यांनी व्हिडिओत केलेल्या विधानानुसार ईडीने त्यांना ५ तासाच्या चौकशीनंतर अटक केली आहे. चौकशी व अटकेच्या कारवाईदरम्यान अमानतुल्लाह खान यांच्या घराबाहेर सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांची एक तुकडी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली होती.
BJP की ED ने फ़र्ज़ी केस में विधायक अमानतुल्लाह खान को हिरासत में लिया।
तानाशाह के ज़ुल्म के आगे क्रांतिकारी नहीं झुकेंगे🔥💯
Team AK pic.twitter.com/qagcPnEKNZ
— Amanatullah Khan AAP (@KhanAmanatullah) September 2, 2024
अमानतुल्लाह खान यांच्या अटकेबाबत आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. ”अमानतुल्लाह खान यांच्या सासूला कर्करोग आहे. तसेच अमानतुल्लाह खान यांनी ईडीकडे काही वेळ मागितला होता. अमानतुल्लाह खान यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसताना त्यांना अटक केली गेली. मात्र ही कारवाई मोदींच्या तानशाहीत सुरु आहे”, असे मनीष सिसोदिया म्हणाले आहेत.
आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना आर्थिक हेराफेरी, अनियमित भरती करण्याचे आरोप आहेत. या आरोपांचे अमानतुल्लाह खान यांनी कायमच खंडन केले आहे. राजकीय स्वार्थापोटी हे आरोप माझ्यावर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मला मागील दोन वर्षांपासून हे त्रास देत आहेत. आमच्या कामामध्ये अडथळा आण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या पक्षाला तोडण्याचे प्रयत्न हे करत आहेत. मात्र आम्ही घाबरणारे नाही, हार मानणारे नाही. आम्ही तुरुंगात जाण्यास तयार आहोत. कोर्टात आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.