बिहार निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच 'आप' पक्षाची मोठी खेळी (Photo Credit- X)
Bihar Election 2025: बिहारच्या विधासभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होती. यात पहिलया टप्प्यात ६ नोव्हेंबरला मतदान होती. तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर मतदान होणार आहे. पण त्या आधीच २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (AAP) मोठी राजकीय खेळी करत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
पक्षाचे बिहार प्रभारी अजेश यादव आणि प्रदेशाध्यक्ष राकेश यादव यांच्या उपस्थितीत पाटणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. ‘आप’ राज्यात सर्वच्या सर्व २४३ जागा स्वबळावर लढवणार असून बिहारच्या द्विध्रुवीय राजकारणाला तिसरा पर्याय देण्याचा पक्षाचा संकल्प आहे.
आम आदमी पक्षाने सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यात ११ विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. या ११ उमेदवारांमध्ये दोन महिलांना नामांकित करण्यात आले आहे. हे उमेदवार स्थानिक समस्या समजून घेतात आणि राज्याच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
AAP releases the first list of 11 candidates for the upcoming Bihar Assembly elections. pic.twitter.com/aTz1y4om5Y — ANI (@ANI) October 6, 2025
राज्यात एनडीए आणि महाआघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अद्याप सुरू असताना, या दोन्ही प्रमुख गटांनी आपली पहिली यादी जाहीर केलेली नाही. बिहार निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करणारा ‘आप’ हा पहिला पक्ष ठरला आहे, ज्यामुळे इतर पक्षांवर दबाव वाढला आहे.
बिहारमधील आम आदमी पक्षाची रणनीती दिल्ली आणि पंजाबमध्ये यशस्वी ठरलेल्या “केजरीवाल मॉडेल” वर आधारित आहे, जे शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक कल्याणावर भर देते. निवडणूक प्रचार स्थलांतर, बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित असेल.
अजेश यादव म्हणाले, “बिहारमधील तरुण रोजगाराच्या शोधात राज्य सोडत आहेत, महागाईमुळे जीवन कठीण झाले आहे आणि भ्रष्टाचार कायम आहे. बिहारमधील लोकांना प्रामाणिकपणा आणि विकासावर आधारित पर्याय हवा आहे.”