file photo
इम्फाळ : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या अपहरणानंतर मणिपूरमध्ये तणाव आणखी वाढला आहे. त्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आसाम रायफल्सच्या चार तुकड्याही इम्फाळ पूर्व जिल्ह्यात तैनात कराव्या लागल्या. विशेष म्हणजे मैतेई गटाच्या आरामबाई टेंगोलच्या कार्यकर्त्यांनी या पोलिस अधिकाऱ्याचे घरातून अपहरण केले होते.
अपहरण झालेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमित कुमार हे मणिपूर पोलिसांच्या ऑपरेशन विंगमध्ये तैनात आहेत. अपहरणाची माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा दलाने तातडीने कारवाई करत पोलिस अधिकाऱ्याची सुटका केली.
घरावर हल्ला, अंदाधुंद गोळीबार
आरामबाई टेंगोलच्या कार्यकर्त्यांनी इम्फाळ पूर्वेतील कुमार यांच्या घरावर हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. कुमार यांनी या गटातील सहा जणांना वाहन चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला होता. हल्ला आणि बचावाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती बिघडली आणि राज्य सरकारला लष्कराची मदत घ्यावी लागली.
आसाम रायफल्सच्या चार तुकड्या
आसाम रायफल्सच्या चार तुकड्या मागवण्यात आल्या आणि घटना घडलेल्या परिसरात तैनात करण्यात आली. घाटी भागात सशस्त्र दल कायदा लागू नाही.
नेमकं काय घडलं…
अमित सिंग हे मणिपूर पोलिस दलात ऑपरेशन्स विंगमध्ये तैनात होते. मंगळवारी संध्याकाळी जवळपास अरामबाई तेंगगोलशी संबंधित 200 शस्त्रधारी लोक त्यांच्या घरात घुसले होते. यावेळी त्यांनी तोडफोड केली.
आरोपींच्या सुटकेसाठी निदर्शने
आरोपींच्या अटकेनंतर मीरा पैबीस (मैतेई महिला गट) च्या समुहाने आरोपींच्या सुटकेची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अरामबाई तेंगगोलशी संबंधित सशस्त्र बंडखोरांनी घरांमध्ये तोडफोड केली आणि वाहनांवर गोळीबार केला.
महिलांची ढाल, 200 सशस्त्र बंडखोर
मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 200 पेक्षा अधिक सशस्त्र बंडखोरांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला केला. तथापि या घटनेतील बंडखोर गटाचे नाव मात्र त्यानी उघड केले नाही. यावेळी झालेल्या कारवाईत रबिनाश मोइरंगथेम आणि कंगुजम भीमसेन हे दोन व्यक्ती जखमी झाले.