केरळ स्फोट प्रकरणी एका आरोपीने केलं आत्मसमर्पण, स्फोट करण्यामागचं कारणही सांगितलं!

केरळमधील कलामासेरी येथील चर्च बॉम्बस्फोटातील आरोपीने आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने एफबी लाईव्ह केले आणि हा स्फोट का केला हे सांगितलं.

    केरळमधील कलामसेरी येथील बॉम्बस्फोटातील (Kerala Blast ) आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण (accused surrendered) केले. डॉमिनिक मार्टिन असे आरोपीचे नाव आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करून या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आणि हे बॉम्बस्फोट का केले हेही सांगितले. रविवारी पहाटेच्या प्रार्थनेदरम्यान चर्चमध्ये लागोपाठ तीन बॉम्बस्फोट झाले ज्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले.

    स्फोटांची जबाबदारी स्वीकारली

    ख्रिश्चनांच्या ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथाचा सदस्य असल्याचा दावा करणार्‍या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. ज्यात रविवारी सकाळी येथील कलामाश्चेरी येथे एका ख्रिश्चन धार्मिक मंडळात झालेल्या अनेक स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. व्हिडिओमध्ये, त्याने म्हण्टलं की संघटनेच्या शिकवणी देशासाठी चांगल्या नसल्यामुळे त्याने हे स्फोट घडवून आणले.”मी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे आणि त्यांनी मला शोधत येण्याची गरज नाही,” असं त्याने म्हण्टंल.

     

    अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) कायदा व सुव्यवस्था एम.आर. अजित कुमार यांनी सांगितले की, डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. स्फोट आपणच घडवून आणल्याचा त्याचा दावा आहे.  धार्मिक गटाचा सदस्य असल्याचा दावा करणार्‍या दुसर्‍या व्यक्तीने एका टीव्ही चॅनेलला सांगितले की अशी कोणतीही व्यक्ती सध्या त्यांच्या संस्थेचा भाग नाही.

    यहोवा पंथ म्हणजे काय?

    हा पंथ अमेरिकेत १९व्या शतकात स्थापन झाला. सुरुवातीला मी ते गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप त्या व्यक्तीने केला. गंमत म्हणून त्यांच्यासोबत गेलो. सुमारे सहा वर्षांपूर्वी मला समजले की ते चांगले संघटन नाही आणि त्यांची शिकवण देशासाठी योग्य नाही. त्यांनी दावा केला की त्यांनी संस्थेला अनेक वेळा शिकवणी दुरुस्त करण्यास सांगितले होते, परंतु ते तसे करण्यास तयार नव्हते. माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याने मी हा निर्णय घेतला, असा युक्तिवाद त्या व्यक्तीने केला. संघटना आणि तिची विचारधारा देशासाठी घातक आहे, त्यामुळे ती संपवायला हवी, असे ते म्हणाले.