Photo Credit- Social Media
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येबाबत पोलिसांकडून गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या बाजूने तापासाला वेग आला आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आगामी काळात बिश्नोई गॅंगकडून देशातील बॉलीवूड स्टार्ससह देशातील राजकीय मंडळीनाही टार्गेट केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. असे असतानाच ओडिया अभिनेता बुद्धादित्य मोहंती याने एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोईकडे काँग्रेस खासदार राहुल गांधींना पुढचे टार्गेट बनवण्याची मागणी केली आहे. मोहंतीच्या या मागणीने वादाची ठिणगी पडली आहे.
या संदर्भात,वादग्रस्त पोस्टनंतर ओडिसातील नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने अभिनेता बुद्धादित्य मोहंती विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.”महाराष्ट्राचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पुढील लक्ष्य राहुल गांधी असावेत,’ असे लिहीत बुद्धादित्य मोहंतीने त्यांच्या X अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनंतर ओडिसातील नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने मोहंतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याने ती वादग्रस्त पोस्टही हटवली आहे. तसेच, एनएसयूआयने आपल्या नेत्याविरोधात अशी वक्तव्ये खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे.
हेही वाचा: Bigg Boss 18 : करणवीर मेहरा अविनाश मिश्रा पुन्हा भिडले, वाचा कोणी कोणाला डिवचलं?
नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल एका ओडिया अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.दरम्यान, हा वाद वाढल्यानंतर मोहंतीने सोशल मीडियावर माफी मागितली.
“राहुल गांधीजींबद्दलच्या माझ्या मागील पोस्टचा उद्देश त्यांना टार्गेट करणे किंवा त्यांना हानी पोहोचवणे किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान करणे हा नव्हता. माझा हेतू त्यांच्याविरोधात लिहिण्याचा नव्हता. जर नकळत मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील. मी मनापासून माफी मागतो.” असे लिहीत त्यांनी माफी मागितली आहे.
हेही वाचा: JioCinema लवकरच बंद होणार? मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय