file photo
शुक्रवारी आरबीयने (RBI) रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. यामुळे कर्ज महागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. ही शक्यता खरी ठरली असून, या लागलीच खासगी क्षेत्रातील आयसीआयलीआय (ICIICI) आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने(Punjab National Bank) व्याजदरात वाढ करण्याच निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदर प्रभावी राहणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना आता वाढीव व्याजदराने कर्ज (Loan) उपलब्ध होईल. या दोन बँकांनी व्याजदर वाढीचा निर्णय घेतल्यानंतर आता इतर बँकांही तातडीने व्याजदर वाढीचा निर्णय घोषीत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
[read_also content=”कुस्तीपटू मोहित ग्रेवलनने आणि दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक https://www.navarashtra.com/sports/wrestlers-mohit-grewalan-and-divya-kakran-won-bronze-medals-312581.html”]
नेमकं किती व्यादरवाढ?
ICICI बँकेने व्याजदरवाढी विषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ICICI बँक बाह्य मानक कर्ज दर म्हणजेच बाह्य बेंचमार्क आधारित कर्ज दर (I-EBLR) RBI च्या रेपो दरावर आधारीत आहेत. केंद्रीय बँकेच्या धोरणानुसार त्यात बदल होतो. रेपो दरात वाढ झाल्याने आयसीआयसीआय बँकेने कर्जावरील व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. I-EBLR आता वार्षिक 9.10 टक्के असून तो 5 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल असे बँकेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही दर वाढीबाबत माहिती दिली. त्यानुसार, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर, 8 ऑगस्टपासून रेपो संबंधित कर्ज दर (RLLR) 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे. हा वाढीव दर 8 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल. रेपो दरावर कर्जाचे दर अवलंबून असतात. रेपोमधील कोणताही बदल झाला की त्यानुसार दर वाढतो किंवा कमी होतो. बँका त्याआधारे कर्जावरील व्याजदरात बदल करतात.
[read_also content=”पाकिस्तानी खेळाडूला लोळवत दीपक पुनियाचा “सुवर्ण” विजय https://www.navarashtra.com/sports/deepak-punias-golden-victory-by-beating-a-pakistani-player-312567.html”]