अजित पवार यांनी दिल्ली विधानसभेसाठी जाहीर केले उमेदवार (फोटो - सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदानो होणार आहे. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान महराष्ट्र विधानसभेत मोठे यश प्राप्त केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपले उमेदवार दिल्ली निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत.
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे . सध्या अजित पवार महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सहभागी आहेत. सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदावर कार्यरत आहेत. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवार हे भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी मोठे यश प्राप्त केले आहे. आता त्यांनी दिल्ली विधानसभेसाठी कंबर कसली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले 30 उमेदवार उभे केले आहेत. वी दिल्ली, करावल नगर, कालकाजी या हाय प्रोफाइल जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. पक्षाने नवी दिल्ली मतदारसंघातून विश्वनाथ अग्रवाल, कालकाजी मतदारसंघातून जमील आणि करावल नगर मतदारसंघातून संजय मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांना आपला राष्ट्रवादी कॉँग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून निर्माण करायचा आहे . त्यादृष्टीने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.
NCP ने आगामी #DelhiElection2025 के लिए 30 उम्मीदवारों की सूची जारी की। pic.twitter.com/kSBxBGCM7D
— ANI_HindiNews (@AHindinews) January 17, 2025
भाजपने प्रसिद्ध केला जाहीरनामा
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यातील पहिला भाग भाजपने जाहीर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ने जाहीरनामा प्रसिद्ध केला. आमची सत्ता आल्यास सध्या सुरू असलेल्या योजना बंद केल्या जाणार नाहीत, अंतर त्यातील भ्रष्टाचार संपवला जाईल असे नड्डा म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात कोकोणती आश्वासने दिली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाप्रमाणे भाजपने देखील दिल्लीतील महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसीडी देण्याचे वचन दिले आहे. तसेच होळी आणि दिवाळीत एक सिलेंडर मोफत दिला जाणार आहे. दिल्लीत भाजप सरकार सत्तेत आल्यावर गर्भवती महिलांना २१,००० रुपये एकरकमी दिले जातील आणि पोषण आहार देखील दिला जाईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.दिल्लीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 2 ते अडीच हजार पेन्शन दिली जाणार आहे. ७० वर्षांवरील व्यक्ती, विधवा आणि अपंगांना ३,००० रुपये मिळणार आहेत. यामध्ये ५०० रुपयांची वाढ देण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिलांचे मतदान आपल्या पक्षाच्या बाजूने वाढवण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत.