अहमदाबादमध्ये एअर assenger Flight Crash Ahmedabad: इंडियाच्या विमानाला अपघात (फोटो- सोशल मीडिया)
अहमदाबाद: Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार हे विमान एअर इंडियाचे असल्याचे म्हटले जात आहे. हे विमान कुठून कुठे जात होते हे समजू शकलेले नाही. हे विमान रहिवाशी परिसरात कोसळले आहे.
TRAGIC NEWS!
Passenger plane CRASH just meters away from Ahmedabad airport.#Ahmedabad #Airplanecrash #crash pic.twitter.com/Deok0xrTg9
— Perlina Trump (@perlinaino) June 12, 2025
अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान अहमदाबामध्ये कोसळले आहे. एअर इंडियाचे एआय १७१ हे विमान कोसळले आहे. विमान कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. उड्डाण करताना हे विमान कोसळले आहे. लंडनला जाणाऱ्या या विमानाने नुकतेच उड्डाण केल्याने त्यामध्ये इंधन देखील मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या विमान दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. रहिवाशी इमारती देखील या घटनेत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जीवितहानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एअर इंडियाचे ड्रीमलायनर हे बोईंग विमान अहमदाबादच्या मेघानीनगर या परिसरात कोसळले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाडया आग घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Flight AI171, operating Ahmedabad-London Gatwick, was involved in an incident today, 12 June 2025. At this moment, we are ascertaining the details and will share further updates at the earliest on https://t.co/Fnw0ywg2Zt and on our X handle (https://t.co/Id1XFe9SfL).
-Air India…
— Air India (@airindia) June 12, 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण काय?
अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. मात्र हे विमान कशामुळे कोसळले आहे, याचे स्पष्ट कारण अजूनही समोर आलेले नाही.
विमानात किती प्रवासी होते?
अहमदाबाद-लंडन हे प्रवासी विमान कोसळले आहे. उड्डाण केल्या केल्या ७ मिनिटांमध्ये हे विमान कोसळले आहे. दरम्यान ३०० प्रवासी क्षमता असलेल्या या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करतासल्याची माहिती समोर येत आहे.
कोणत्या एअरलाइनचा समावेश होता?
अह्मदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान एअर इंडिया कंपनीचे असल्याचे समोर येत आहे.
दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी उड्डाण केलेले एअर इंडियाचे हे विमान कोसळले आहे. बीएसएफचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. एनडीएआरइच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.