विमानांचे इमर्जन्सी लँडिंग ( फोटो-istockphoto )
नवी दिल्ली: नवी दिल्ली आणि हैद्राबादमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सकाळच्या सुमारास दिल्लीतून आणि हादरबाडवरून दोन विमानांनी टेक ऑफ केले होते. मात्र काही कारणांमुळे या दोन्ही विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या दोन्ही विमानातून सुमारे २६० प्रवासी प्रवास करत होते. दिल्ली एअरपोर्टवरून लेहला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे समजते आहे.
तर दुसरीकडे हैद्राबादवरुन तिरुपतीला जाण्यासाठी स्पाईसजेट एअरलाईन्सच्या विमानाने उड्डाण भरले होते. मात्र १० मिनिटांतच हे विमान पुन्हा हैद्राबादला लँड करण्यात आले आहे. हैद्राबाद ते तिरुपती या फ्लाईटमध्ये ८० प्रवासी प्रवास करत असल्याचे समजते आहे. या दोन्ही फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग केल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सध्या दोन्ही फ्लाईटमधीं २६० प्रवासी सुखरूप असल्याचे समजते आहे.
हैद्राबादवरून तिरुपतीला जाणारे विमान हे स्पाईसजेट कंपनीचे होते. या विमानातून एकूण ८० जण प्रवास करत होते. उड्डाण भरताच १० मिनिटांच्या कालावधीत तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान पुन्हा हैद्राबाद एअरपोर्टवर लँड झाले आहे. मात्र तांत्रिक बिघाड कि हवामान खराब झाल्याने असा निर्णय घेण्यात आला हे अजून अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
कोचीन-दिल्ली फ्लाइटचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान कोचीनवरून दिल्लीकडे चालले होते. मात्र अचानक या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंडिगोच्या 6E 2706 फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 च्या सुमारास कोचीनवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोची फ्लाइट 6E 2706 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती. दरम्यान त्यानंतर हे फ्लाइट नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सध्या विमानाची तपासणी केली जात आहे.
टर्ब्युलन्समुळे इंडिगो फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग
दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6E-2142 मध्ये आज खराब हवामानात तीव्र गोंधळ आणि वीज चमकल्याने गोंधळ उडाला. श्रीनगरवरून विमान जात असताना ही घटना घडली आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व २२७ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत आणि विमानाचे श्रीनगर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.