हैदराबाद: वायएसआर (YSRTP) तेलंगाणा पक्षाच्या नेत्या आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या बहिण वायएस शर्मिला (YS Sharmila) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादमध्ये सध्या तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरण चांगलच गाजतय. या प्रकरणी त्या एसआयटी कार्यालयात जात असताना पोलिस आणि वायएस शर्मिला यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी संतापलेल्या शर्मिला यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत कानाखाली मारली. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
[read_also content=”‘भाजपला हिरो वरुन झिरो करावे लागेल’; नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींचं वक्तव्य https://www.navarashtra.com/india/mamata-banerjee-says-bjp-should-be-zero-now-after-meeting-nitish-kumar-and-tejashwi-yadav-nrps-391201.html”]
तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी शर्मिला या विशेष तपास पथकाच्या कार्यालयात जाताना हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. शर्मिला कार्यालयाजवळ येताच पोलीस कर्मचारी त्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांना कार्यलयात जाण्यापासुन रोखल्यामुळे शर्मिला आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी त्यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत कानाशिलात लगावली. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हैदराबादमधील जुलाबी हिल्स पोलीस स्टेशनमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#WATCH | Telangana Police detains YSRTP Chief YS Sharmila and shifts her to the local police station. She was detained after police officials received information about her visiting SIT office over the TSPSC question paper leak case pic.twitter.com/n6VaYgRarx
— ANI (@ANI) April 24, 2023
काही दिवसांपुर्वी तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाने (TPSC) पेपर फुटले. यावेळी विविध अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक अभियंता, नगरपालिका सहाय्यक अभियंता, तांत्रिक अधिकारी आणि कनिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदांसाठीची भरती परीक्षा रद्द केली. यामुळे सध्या तेलंगणात तीव्र निदर्शने केली जात आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 3 भरती परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
शर्मिला यांना अटक झाल्याच्या वृत्तानतंर त्यांच्या आई वायएस विजयम्माही या त्यांना भेटण्यासाठी जुलाबी हिल्स पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी देखली पोलिसांसोबत धक्काबुक्की केल्याच सांगण्यात येत आहे.
#WATCH | YSRTP Chief YS Sharmila’s mother YS Vijayamma shoves police personnel as she visits her daughter at Jubilee Hills Police Station after her detention#Hyderabad pic.twitter.com/jdchj1LnTU
— ANI (@ANI) April 24, 2023