arvind kejriwal

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. तसेच देशामध्ये 'इंडिया' आघाडीचे सरकार बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. तसेच देशामध्ये ‘इंडिया’ आघाडीचे सरकार बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    केजरीवाल यांनी शनिवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी केजरीवाल म्हणाले, भाजपचे लोक इंडिया आघाडीला विचारत आहेत की तुमचा पंतप्रधान कोण आहे? परंतु मी सांगतो की, खुद्द मोदी हे पुढचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. ते अमित शाह यांच्यासाठी मते मागत आहेत. पंतप्रधान मोदी पुढच्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहेत.

    खुद्द मोदींचा नियम आहे की 75 वर्षांच्या नेत्यांना रिटायर केले जाईल. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना त्यांच्या वाढत्या वयामुळे निवृत्ती दिली होती.

    …तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायच आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील. माझ्याकडून तुम्ही अॅफिडेविट लिहून घ्या, हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टॅलिन तुरुंगात दिसतील, असा दावा केजरीवाल यांनी केला.