आपने सर्व जागांवर उतरवले उमेदवार, ३८ जणांची चौथी यादी जाहीर ; केजरीवाल, CM आतिशी लढणार या मतदारसंघातून
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापू लागलं असून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने सर्व ७० जागांवर उमेदवार उतरवले आहेत. ३८ उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. आपने ३२ उमेदवारांची याआधीच घोषणा केली आहे. दरम्यान कस्तुरबानगरमधून विद्यमान आमदार मदनलाल यांना टच्चू देऊन आम आदमी पक्षात प्रवेश केलेल्या रमेश पहलवान यांना तिकीट देण्यात आलं आहे.
चार चौघांमध्ये उधारी मागताय? मग सावधान! नारायणगावमध्ये एकाची डोक्यात दगड घालून हत्या
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील, तर मुख्यमंत्री आतिशी यांना कालकामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवाय ग्रेटर कैलाशमधून सौरभ भारद्वाज, बाबरपूरमधून गोपाल राय, मालवीयनगरमधून सोमनाथ भारती, मटिया महलमधून शोएब, राजेंद्र नगरमधून दुर्गेश पाठक निवडणूक लढणार आहेत.
आज आम आदमी पार्टी ने सभी 70 सीटों पर अपने उम्मीदवार घोषित कर दिए। पार्टी पूरे आत्मविश्वास और पूरी तैयारी के साथ चुनाव लड़ रही है।
बीजेपी गायब है। उनके पास ना CM चेहरा है, ना टीम है, ना प्लानिंग है और ना दिल्ली के लिए कोई विज़न है। उनका केवल एक ही नारा है, केवल एक ही नीति है और… https://t.co/OQ4ehsfKHY
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 15, 2024
Here is our fourth and final list for upcoming Delhi Elections ‼️
Congratulations to all the candidates 🎉
फिर लायेंगे केजरीवाल 🔥💯 pic.twitter.com/YVgypI9mR9
— AAP (@AamAadmiParty) December 15, 2024
आम आदमी पार्टीने एकूण 17 विद्यमान आमदारांची तिकीटं कापली आहेत. उत्तमनगर सीटवर नरेश बाल्यान यांच्या पत्नी पूजा नरेश बाल्यान यांना तिकीट देण्यात आलं आहे. नरेश बाल्यान यांना दिल्ली पोलिसांना मोक्का अंतर्गत अटक केली आहे, त्यामुळे सध्या ते तुरुंगात आहेत.
यावेळी केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. “आम आदमी पक्षाने सर्व 70 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पक्ष पूर्ण आत्मविश्वासाने आणि तयारीसह निवडणूक लढत आहे. भाजपाकडे ना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे, ना टीम आहे, ना योजना आहे आणि ना दिल्लीसाठी कोणतंही ध्येय. त्यांचा एकच नारा आहे, केजरीवाल हटाओ.”
“आमच्याकडे दिल्लीच्या विकासासाठी स्पष्ट दृषटिकोन, योजना आणि त्या राबविण्यासाठी सक्षम आणि सुशिक्षित टीम आहे. गेल्या 10 वर्षांत केलेल्या कामांची एक मोठी यादी आहे. दिल्लीवाले काम करणाऱ्यांना मत करतील, ना की गालिचे देणाऱ्यांना.”, असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.