Photo Credit-Social media महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली..; केजरीवालांचा भाजपवर आरोप
नवी दिल्ली: “या नेत्यांना (भाजपला) केसेस आणि खटल्यांची पर्वा नाही, त्यांची चामडी जाड आहे. पण मी तसा नाही. मी नेता नाही, माझी चामडी जाड नाही. मला चोर आणि भ्रष्टचारी म्हटले की मला फरक पडतो, म्हणूनच मी आज खूप दुखी आहे. माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. म्हणून मी राजीनामा दिला.” अशी प्रतिक्रीया आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. ते दिल्लील जंतरमंतर मैदानावर आयोजित ‘जनता की अदालत सभेत बोलत होते.
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची 13 सप्टेंबरला तिहार तुरुंगातून सुटका झाली. त्यांनी 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
हेही वाचा: बीडमध्ये अंबेजोगाई लातूर रोडवर भीषण अपघात; चार जण जागीच ठार
अरविंद केजरीवाल म्हणाले,“जर मी बेईमान झालो असतो, तर दिल्लीला मोफत वीज कशी दिली असती? वीज बिल मोफत देण्यासाठी 3,000 कोटी रुपये लागतात. जर मी बेईमान झालो असतो, तर दिल्लीला मोफत वीज कशी दिली असती, शिक्षण, आरोग्य आणि महिलांसाठी मोफत प्रवास या क्षेत्रात काम केले असते. सर्व पैसे मी खाऊन टाकले असते. आज 22 राज्यात त्यांचे सरकार आहे, पण कोणत्या राज्यात वीज मोफत आहे. कोणत्या राज्यात महिलांचे प्रवासाचे भाडे फ्री आहे. कुठेच नाही. मग चोर कोण आहे, आज तुम्हाला विचारायला आलो आहे, तुम्ही सांगा केजरीवाल चोर आहे की केजरावालला तुरुंगात पाठवणारे चोर आहेत, असा सावलहीत त्यांनी उपस्थित केला.
मी माझ्या आयुष्यात फक्त आदर आणि प्रामाणिकपणा कमावला आहे. माझ्या पक्षाच्या बँकेत कोणतेही पैसे नाहीत. मी फक्त आदर कमावला आहे. 10 वर्षांनंतर मी सीएम पदाचा राजीनामा दिला आहे. काही काळानंतर मी मुख्यमंत्री निवास देखील सोडेन. आज माझ्याकडे दिल्लीत राहण्यासाठी घरही नाही. पण नवरात्रीच्या दरम्यान मी मुख्यमंत्री निवासस्थान सोडेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा: बारामतीतल्या बॅनर्सची पुन्हा चर्चा; सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार फिक्स आमदार
या लोकांनी आमच्यावर पीएमएलए कलम लावले, त्यात जामीनही मिळत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, कारण ही केस खोटी बनावट आहे, हे त्यांना माहिती झाले, म्हणून न्यायालयाने आम्हाला बेल दिली. पण मी ठरवले होते. कोर्ट जोपर्यंत मला निर्दोष जाहीर करत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही, असं मी ठरवलं होतं. त्यामुळे मी जनतेच्या कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. मी अशा डागासोबत जगूही शकत नाही आणिमरूही शकत नाहीत मी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय़ घेतला.
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या योजनांनुसार अरविंद केजरीवाल सर्व 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये जनता अदालत स्थापन करणार आहेत. आम आदमी पार्टीचे सरकार हे प्रामाणिक सरकार आहे की नाही, आम्ही प्रामाणिक आहोत की नाही, असे प्रश्न आम्ही थेट जनतेच्या कोर्टात विचारू, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.
हेही वाचा: सुईमध्ये धागा ओवण्यात तुम्हालाही अडचण येते का? जाणून घ्या सोप्या टिप्स