आसामच्या मुख्यमंत्र्यांचा कॉँग्रेसवर गंभीर आरोप (फोटो- ani)
दिसपूर: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा ही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. सोशल मिडिया अकाऊंटबाबत त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची आता राजकीय वर्तुलच मोठी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी कॉँग्रेसवर नेमके काय आरोप केले आहेत, ते जाणून घेऊयात.
‘इस्लामिक देशातील काही हँडलर हे कॉँग्रेसच्या समर्थनार्थ 5 हजार पेक्षा अधिक सोशल मिडिया अकाऊंट चालवत आहेत”, असा गंभीर आरोप आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांनी केला आहे. 2026 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीयआधी आसामच्या राजकारणात हा सर्वात मोठा परकीय हस्तक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेक्षी संबंधित असून, संबंधित यंत्रणा याचा तपास करत असल्याचे मुख्यमंत्री शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना त्यांनी कॉँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर पूर्वी केलेल्या आरोपंच देखील उल्लेख केला. ते म्हणाले,”पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या निमंत्रणावरून गौरव गोगोई पाकिस्तानला गेले होते. ते तिकडे कशासाठी गेले होते याचे भक्कम कागदपत्रे आमच्याकडे आहेत.”
गौरव गोगोई यांच्यावर काय होते शर्मांचे आरोप
कॉँग्रेस खासदार गौरव गोगोई ही पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणाअसलेल्या आयएसआयच्या निमंत्रणावरून पाकिस्तानला गेले होते. याबाबत यांच्याकडे माहिती आहे. ते नक्कीच पर्यटनाच्या दृष्टीने तिथे गेले नव्हते तर, प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीने गेले होते.
हेमंत शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर कॉँग्रेसकडून अजून उत्तर आलेले नाही. यावर बोलताना पक्षाकडे लवपण्यासारखे काही नसेल तर ते पुढे येऊन या आरोपाना उत्तर का देत नाहीत असा प्रश्न मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी उपस्थित केला आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी या केंद्रीय निवडणूक आणि गृह मंत्रालयाकडे चौकशीची मागणी केली आहे.
आसाम सरकार स्वतः देणार नागरिकांच्या हाती बंदूक
आसाम मंत्रिमंडळाने २८ मे रोजी एका विशेष योजनेला मंजुरी दिली ज्याअंतर्गत बांगलादेश सीमेजवळील संवेदनशील आणि दुर्गम भागातील स्थानिक नागरिकांना शस्त्र परवाने दिले जातील. या भागात बंगाली भाषिक मुस्लिम बहुसंख्य आहेत. आसाम सरकारच्या या वादग्रस्त आणि चिंताजनक निर्णयावर नागरी समाजाने आक्षेप घेणे योग्य वाटते. ईशान्येला अधिक बंदुकांची गरज नाही.
आसाम सरकार स्वतः देणार नागरिकांच्या हाती बंदूक; यामुळे पुन्हा अराजकता अन् अशांततेची शक्यता
अनेक वर्षांच्या कठीण कारवाया, वाटाघाटी आणि तडजोडींनंतर, ईशान्येकडील १०,००० हून अधिक दहशतवाद्यांनी आपले शस्त्रे टाकली आहेत आणि आता लोकांना पुन्हा बंदुका हाती घेण्यास भाग पाडणे सुरक्षेच्या उद्देशालाच हरवून बसते. यामुळे ईशान्येकडील परिस्थिती सामान्य होत आहे ही कहाणी देखील नष्ट होते. असे असूनही, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा त्यांच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. ते म्हणाले की, ‘हा एक महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय आहे. या जिल्ह्यांतील आदिवासी लोकांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे, विशेषतः बांगलादेशातील अलिकडच्या घडामोडींमुळे. त्यांना सीमेपलीकडून किंवा त्यांच्याच गावांमधून हल्ल्यांचा धोका असतो. जर हा निर्णय आधीच घेतला असता, तर अनेक आदिवासी कुटुंबांना त्यांच्या जमिनी विकाव्या लागल्या नसत्या किंवा स्थलांतर करावे लागले नसते.