भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) एक अजब प्रकार उघडकीस आला असून रेल्वेने अतिक्रमण हटवण्यासाठी चक्क मंदिरात विराजमान हनुमानजींना नोटीस पाठवली आहे. मध्यप्रदेश राज्यातील मुरैनामध्ये भारतीय रेल्वेच्या कारभाराचा अजब प्रकार समोर आला आहे.
रेल्वे प्रशासनाने मंदिरात विराजमान बजरंग बलीलाच नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये रेल्वेने हनुमानजीने या नोटीसमध्ये बजरंग बली यांनाच अतिक्रमणकारी म्हणत सात दिवसात अतिक्रमण हटवण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर इशारा देण्यात आला आहे की,अतिक्रमण न हटवल्यास रेल्वे जबरदस्तीने कारवाई करत जेसीबीच्या खर्चाची वसुलही केली जाईल.
नेमकं काय आहे प्रकरण?
सध्या रेल्वेकडून ग्वाल्हेर ते श्योपूर ब्रॉडगेज लाइनचे काम सुरू आहे. मुरैना जिल्ह्यातील सबलगड तातुलक्यात हनुमान मंदिर ब्रॉडगेज रेल्वेमार्गात अडचण ठरत आहे. सांगितले जात आहे की, हे मंदिर रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आले आहे. यामुळे भारतीय रेल्वेने बजरंगबलीला नोटिस जारी केली आहे. नोटीर मंदिराच्या प्रवेशद्वारावरही लावले आहे. यामध्ये हनुमानजीने रेल्वेच्या जागेवर निवासस्थान बनवून अतिक्रमण केल्याचे म्हटले आहे. हे अतिक्रमण सात दिवसात न हटवल्यास कारवाई करण्याचा इशारा नोटीसमध्ये दिला आहे.याचा खर्च बजरंग बली यांनीच द्यायचा आहे. या नोटीसची प्रत सहायक मंडल अभियंता ग्वाल्हेर आणि जीआरपी ठाणे प्रभारी ग्वाल्हेर यांना पाठवण्यात आली आहे. हे नोटीस सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
दरम्यान या नोटीसबाबत झांसी रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज माथुर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी म्हटले की, रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ही सामान्य प्रक्रिया आहे. मात्र या नोटिसीत हनुमानजीचे नाव का घेतले यावर त्यांनी म्हटले की, याबाबत माहिती घेतली जाईल.