राजू वाघने मारले यूपीएससीचे मैदान (फोटो -सोशल मिडिया )
पुणे: भारतीय लोकसेवा आयोगाचा काल निकाल लागला. यात महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे याने महाराष्ट्रातून पहिला आणि देशातून तिसरा रॅंक तर संपदा वांगे हिने देशात ८३९ वा रॅंक मिळवला आहे. नाशिकच्या राजू नामदेव वाघ यांनी ८७१ रॅंक मिळवित मनाला गवसणी घातली आहे. सध्या ते बस्तर जिल्ह्यात सीआरपीएफ कमांडंट म्हणून रुजू आहेत.
राजू वाघ यांचे शिक्षण नवोदय विद्यालयात झाले आहे. नंतर त्यांनी एनआयटी नागपूर मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी अगोदर ‘कोल इंडिया’ या कंपनीत २०१४-१९ पर्यंत नोकरी केली आहे. २०१८ ला वाघ यांनी यूपीएससीची पहिली मुलाखत दिली होती.
“नोकरी करत करत यूपीएससीची तयारी केली, सकाळी चार ते सहा सात असे सकाळी दोन-तीन तास आणि संध्याकाळी दोन तीन तास आणि शनिवार-रविवार पूर्णवेळ नियमित अभ्यास केला. या वर्षाच्या मुलाखतीला माझी बायको पौर्णिमा वाघ ह्या पण होत्या. सोबत अभ्यास केल्याचा फायदा मला नक्कीच झाला. पोर्णिमा ह्या मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शुभ्र रंजन अकॅडमीच्या शुभ्रा मॅडम यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
– राजू वाघ,
(सीआरपीएफ कमांडंट बस्तर)
UPSCचा अंतिम निकाल जाहीर
लोकसेवा आयोगाने UPSC CSE अंतिम निकाल २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. निकाल पाहण्यासाठी परिक्षार्थीं upsc.gov.in वर भेट देऊन एका क्लिकवर पाहू शकतात.
UPSC CSE Final Result 2024: UPSC त प्रथम क्रमांक पटकावणारी कोण आहे शक्ती दुबे?
आयएएसमध्ये १८० पदे
सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजेच (IAS) एकूण १८० पदे भरली जातील. यापैकी ७३ पदे अनारक्षितांसाठी, २४ एससीसाठी, १३ एसटीसाठी, ५२ ओबीसीसाठी आणि १८ ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी राखीव आहेत.
तर यावर्षी आयपीएस म्हणजेच भारतीय पोलिस सेवेसाठी १५० पदांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ६० पदे अनारक्षित आहेत, २३ एससी, १० एसटी, ४२ ओबीसी आणि १५ ईडब्ल्यूएससाठी राखीव आहेत.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा, गट अ – २० पदे
भारतीय नागरी लेखा सेवा, गट अ – २५ पदे
भारतीय संरक्षण लेखा सेवा, गट अ – २४ पदे
भारतीय माहिती सेवा, गट अ – ३७ पदे
भारतीय महसूल सेवा (आयकर), गट अ – १८० पदे
भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS), गट अ – १५० पदे
दिल्ली, अंदमान निकोबार पोलिस सेवा (DANIPS), गट ब – ७९ पदे