फोटो- टीम नवराष्ट्र
राजधानी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनावर भाजप खासदार कंगना रानौत यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या वक्तव्यावरून भाजपवर विरोधी पक्ष टीका करत आहे. त्यानंतर कंगनाच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून भाजपवर जोरदार टीका केली जाऊ लागली. त्यानंतर भाजपने अधिकृत परिपत्रक काढत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कंगना रानौतने केलेल्या वक्तव्यावर भाजपने अधिकृत परिपत्रक काढत कंगना रानौतच्या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष खासदार कंगना रानौतवर काही कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कंगना रानौत या भाजपच्या हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसांघातील खासदार आहेत.
भाजप खासदार कंगना रानौत यांनी शेतकरी वक्तव्यावर केलेले विधान हे पक्षाचे मत नाही. भारतीय जनता पक्ष कंगना रानौतच्या विधानाशी असहमत आहे. पक्षाकडून पक्षाच्याबाजूने बोलण्यास कंगना रानौत यांना कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी दिलेली नाही. तसेच भविष्यात अशी कोणतीही विधाने करू नयेत याबद्दल रानौत यांना सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्ष हा सबका साथ, सबका विकास या तत्वावर चालणारा पक्ष आहे.
The statement made by BJP MP Kangana Ranaut in the context of the farmers' movement is not the opinion of the party. BJP disagrees with the statement made by Kangana Ranaut. On behalf of the party, Kangana Ranaut is neither permitted nor authorised to make statements on party… pic.twitter.com/DXuzl3DqDq — ANI (@ANI) August 26, 2024
एका मुलाखतीदरम्यान भाजप खासदार कंगना रणौत म्हणाली की, आमचे सर्वोच्च नेतृत्व कमकुवत असते तर बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात होऊ शकते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात काय झाले ते सर्वांनी पाहिले. निदर्शनाच्या नावाखाली हिंसाचार पसरवण्यात आला. तिथे बलात्कार होत होते, लोकांना मारले जात होते, फासावर लटकवले जात होते. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे औचित्य साधून कंगना म्हणाली की, जेव्हा हे विधेयक मागे घेण्यात आले तेव्हा सर्वच भोंदूबाबांना धक्का बसला. कारण त्याचं नियोजन खूप लांबलचक होतं. आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक हिंसाचार पसरवत आहेत. तसेच शेतकरी आंदोलनाच्यावेळी अनेक महिलांवर अत्याचार आणि हत्या होत होत्या.