चंदीगडमध्ये भाजपचा विजय (फोटो- सोशल मीडिया)
चंदीगड महानगरपालिकेत भाजपचा विजय
सौरभ जोशी चंदीगडचे नवे महापौर
उपमहापौरपदाच्या निवडणुकीवर कॉँग्रेसचा बहिष्कार
चंदीगडमध्ये नुकतेच महानगरपालिका निवडणूक पार पडली. या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने विजय प्राप्त केला आहे. आज सकाळी 11 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये भाजपने विजय मिळवला आहे. आता वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडणे बाकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सौरभ जोशी हे महापौर म्हणून नाव जाहीर झाले आहे.
सौरभ जोशी यांना चंदीगड महानगरपालिकेत 18 मते मिळाली. तर आम आदमी पक्षाला 11 आणि कॉँग्रेसला 7 मते प्राप्त झाली. सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये सर्वात प्रथम कॉँग्रेस आमदारांनी मतदान केले. या वेळेस निवडणूक बॅलेट पेपर ऐवजी हात उंचावून घेतली गेली.
आम आदमी पक्षाने कॉँग्रेसचे समर्थन केले नाही. याचा फायदा भाजपला झाला. यानंतर सौरभ जोशी यांचे महापौर म्हणून जाहीर झाले. भाजपच्या सर्व 18 आमदारांनी सौरभ जोशी यांच्या नावासाठी आपला पाठिंबा दर्शवला. महापौर पदासाठी निवड झाल्यावर सौरभ जोशी भावुक झाल्याचे दिसून आले.
बहुमत असूनही भाजपला धक्का! काँग्रेस, राष्ट्रवादीची मोठी खेळी; जतमध्ये नेमकं काय घडलं?
चंदीगड महानगरपालिकेसाठी एकूण 36 जण मतदान करतात. यामध्ये एक मत हे खासदाराचे असते. 35 आमदार आणि एक खासदार महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान करतात. भाजपकडे सर्वाधिक 18 आमदारांचे संख्याबळ असल्याने भाजपच्या विजयाचा मार्ग सोपं वाटत होता, त्यानुसार भाजपचा विजय झाला आणि सौरभ जोशी महापौर झाले आहेत.
आम आदमी पक्षाला केवळ 11 मते
भाजप उमेदवाराने वरिष्ठ उपमहापौरपदाची निवडणूक देखील जिंकले आहे. त्यांना 18 मते मिळाली. तर आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 11 मते मिळाली. तर उपमहापौरपदाची निवडणूक देखील भाजपने जिंकली आहे. या निवडणुकीत देखील भाजपला 18 तर आम आदमी पक्षाला 11 मते मिळाली. दरम्यान आम आदमी पक्षाने कॉँग्रेसवर भाजपला साठी दिल्याचा आरोप केला आहे.
Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा
बहुमत असूनही भाजपला धक्का!
जत नगरपरिषदेच्या विषय समिती तसेच सभापती निवडीत मंगळवारी राजकीय नाट्य रंगले. स्पष्ट बहुमत असूनही भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची साथ घेत चतुर राजकीय खेळी करत स्वतःसह राष्ट्रवादीच्या पदरातही प्रत्येकी एक सभापती पद पाडून घेतले. परिणामी भाजपला दोन महत्त्वाच्या सभापती पदांपासून वंचित राहावे लागले.






