संग्रहित फोटो
नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती सभापती निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या सभेत सुरुवातीपासूनच तणावपूर्ण वातावरण होते. एका अपक्ष नगरसेवकासह भाजपकडे बहुमत असल्याने सर्व विषय समित्यांवर भाजपचाच वरचष्मा राहील, अशी जोरदार चर्चा होती. विशेषतः उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे भाजपला सर्वच समित्या मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र, ऐनवेळी काँग्रेसने राजकीय डावपेच आखत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सोबत घेत समीकरण बदलले. या अनपेक्षित हालचालीमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आणि सभापती पदांचे गणित पूर्णपणे उलटले. काँग्रेसला महिला व बालविकास समितीचे सभापती पद मिळाले, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने शालेय शिक्षण समितीचे सभापती पद आपल्या पदरात पाडून घेतले.
मंगळवारी झालेल्या विषय समिती सभापतींची निवड पुढीलप्रमाणे






