सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोंडीत येथे झालेल्या सभेत दिव्या जगदाळे यांनी सांगितले की, आगामी काळात दोन गावांना जोडणारे रस्ते आपल्याला तयार करायचे आहेत. त्याचबरोबर गावातील स्थानिक विकास कामे करतानाच महिला सक्षमीकरण हे धोरण राबवायचे आहे. महिलांना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. महिला शारीरिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी गावागावात आरोग्य शिबिर घेणे त्याचबरोबर आज ग्रामीण भागातील दुष्काळ कायमचा हटविणे आणि पाण्याची टँकर कमी करण्यासाठी जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल. गावागावात ग्रामसभा घेऊन त्या माध्यमातून गावातील स्थानिक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे दिव्या जगदाळे यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. दरम्यान निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिवे गराडे यांच्यासह भाजप उमेदवारांना स्थानिक मतदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मतदारांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होत असल्याचे दिसून येत आहे.
दिव्या गंगाराम जगदाळे या भाजपच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार असून, ललिता दिलीप कटके या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. दोन्हीही उमेदवार सुशिक्षित आणि ग्रामीण समस्येची जाण असणाऱ्या उमेदवार आहेत. कोणत्या भागात काय समस्या आहेत आणि प्रश्न काय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले पाहिजे याबद्दल त्यांना माहिती आहे. फक्त आश्वासने न देता ज्यावरती काम करणे शक्य आहे त्याच गोष्टीवर भर त्यांनी दिला आहे. स्थानिक प्रश्नांना हात घातला जात असल्याने गावागावातील मतदारांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
दोन्ही उमेदवारांनी आत्तापर्यंत जवळपास तीन ते चार प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. दरम्यान कोडीत येथे भाजप उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्यासह कोंडीत, चांबळी, भिवरी, बोपगाव, गराडे आणि परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान भाजपचे संजय कामठे यांनी सांगितले की, पुरंदरचा पश्चिम भाग पुण्याला लागून असून, येथील शेतकरी मालाची ने- आण करण्यासाठी दररोज पुण्याला ये- जा करीत असतात. आणि या परिसरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. आता या निवडणुकीत दोन्ही उमेदवार सक्षम असल्याने त्यांच्याकडून आमच्या प्रश्नांची सोडवणूक होईल याची खात्री आहे. त्यामुळेच सुशिक्षित उमेदवार असलेल्या दिव्या जगदाळे आणि ललिता कटके यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन संजय कामठे यांनी केले आहे.






