वारंवार उद्भवणाऱ्या गॅस ॲसिडिटीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! उद्भवू शकतात गंभीर आजार
अपचन होण्याची कारणे?
ॲसिडिटी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
ॲसिडिटी होऊ नये म्हणून जीवनशैलीत कोणते बदल करावेत?
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला गॅस, अपचनाची समस्या उद्भवत आहे. पण बऱ्याचदा ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या अतिशय सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. उपाशी पोटी चहा पिणे, रात्री कोणत्याही वेळी जेवणे, अपचन, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, जागरण इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे काहींना सतत ॲसिडिटी, गॅस आणि अपचन होते. ॲसिडिटी झाल्यानंतर डोकेदुखी, मानेच्या नसांमध्ये वेदना, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यामुळे पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव येतो. खाल्लेले अन्नपदार्थ पचन करण्यासाठी जास्त वेळ लागतो. अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अन्नाचे बारीक कण अन्ननलिकेमध्ये अडकून राहतात, ज्यामुळे ॲसिडिटी वाढते.(फोटो सौजन्य – istock)
पोट फुगणे हे पित्ताशयात झालेल्या खड्यांचे गंभीर लक्षण असू शकते. याशिवाय काहीवेळा पोटाच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे हर्निया किंवा पोटाच्या कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात. शरीराला गंभीर आजारांपासून कायमच दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे ७० टक्के आजार बरे होतात आणि शरीराला गंभीर आजारांची लागण अजिबात होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ॲसिडिटी होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? ॲसिडिटी होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कोणत्याही वेळी जेवणे, रात्री कधीपण खाणे, पाणी कमी पिणे, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे ॲसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. वारंवार ॲसिडिटी किंवा अपचन होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत. कारण पोटात वाढलेल्या अल्सरमुळे सतत पोटासंबंधित समस्या उद्भवू लागतात. कमी पाण्याचे सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यामुळे पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव निर्माण होतो आणि आरोग्य बिघडते.
वारंवार होणाऱ्या ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. नियमित भरपूर पाण्याचे सेवन, ताजे अन्नपदार्थ, फळे, सुका मेवा इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच नियमित १० किंवा ३० मिनिटांपर्यंत शारीरिक हालचाली केल्यास कायमच निरोगी राहाल. पचनाच्या कोणत्याही समस्या कधीच उद्भवणार नाहीत. जेवणताना घाई न करता प्रत्येक घास ३२ वेळा चावून खावा. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होतात. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी.
Ans: दररोज नियमित शौचास होणे, पोट साफ होणे, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या नसणे आणि चांगली ऊर्जा पातळी असणे ही निरोगी आतड्यांची लक्षणे आहेत।
Ans: फायबरयुक्त पदार्थ (फळे, भाज्या, धान्य), कडधान्ये आणि प्रोबायोटिक पदार्थ (दही, ताक, आंबवलेले पदार्थ) खावेत. यामुळे शरीरात फायदेशीर बॅक्टेरियांची संख्या वाढते.
Ans: होय, आतड्याला 'दुसरा मेंदू' म्हटले जाते, कारण मेंदू आणि आतड्यांचा थेट संबंध असतो. खराब आतड्यांमुळे ताणतणाव आणि चिंता वाढू शकते।






