बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचा मोठा निर्णय: ४८ तीर्थक्षेत्रांमध्ये गैर-हिंदूंना प्रवेश बंदीची तयारी
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) चार धाम आणि संबंधित प्रमुख तीर्थस्थळांमध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेश बंदी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. यापूर्वी देशातील बद्रीनाथ आणि केंदारनाथ या मंदिरांमध्ये गैरहिंदुना प्रवेशबंदी होती. पण आता या दोन तीर्थक्षेत्रांबरोबरच देशातील ४८ मंदिरे आणि तीर्थक्षेत्र पर्यंटन स्थळांवर गैर हिंदुंना प्रवेशास बंदी घालण्यात येणार आहे, या संदर्भात बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदीर समितीच्या वतीने मोठी पाऊले उचलण्यास सुरूवात झाली आहे. या संदर्भात समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी माहिती दिली आहे.
हेमंत द्विवेदी म्हणाले की, “आता केवळ बद्रीनाथ आणि केदारनाथ सारखी तीर्थक्षेत्रे पर्यटन स्थळांसोबतच देशभरातली अनेक मंदिरे, तीर्थस्थाने सनातन धर्माची सर्वोच्च आध्यात्मिक केंद्रे आहेत, जिथे प्रवेश हा नागरी हक्कापेक्षा धार्मिक परंपरा म्हणून पाहिला पाहिजे. सर्व प्रमुख धार्मिक गुरु आणि संताकडून गैर-हिंदूंनी या पवित्र तीर्थस्थळांमध्ये प्रवेश करू नये, अशी मागणी केली जात आहे. सनातन परंपरांचा आदर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. चार धाम ही श्रद्धा आणि आध्यात्मिक साधना केंद्रे आहेत, सामान्य पर्यटन स्थळे नाहीत.”
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या प्रस्तावावर एक निवेदन जारी केले आहे. ” देवभूमी उत्तराखंडमधील तीर्थक्षेत्रे चालवणाऱ्या संस्था आणि संघटनांच्या मतांवर आधारित सरकार आवश्यक ती कारवाई करेल. राज्य सरकार या मुद्द्यावर मंदिर समित्यांच्या निर्णयांना प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक असेल,” असं धामी सरकारकडून सांगण्यात आले आहे.
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) आपल्या अखत्यारीतील ४८ मंदिरे, तलाव आणि धार्मिक स्थळांवर बिगर-हिंदूंना प्रवेश बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावामुळे उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले असून काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. BKTC च्या या प्रस्तावात केदारनाथ धाम, बद्रीनाथ धाम, तुंगनाथ, मदमहेश्वर, त्रियुगीनारायण, जोशीमठ येथील नरसिंह मंदिर, गुप्तकाशीतील विश्वनाथ मंदिर, तप्त कुंड, ब्रह्मकपाल आणि शंकराचार्य समाधी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ४८ देवस्थानांचा समावेश आहे.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांनी या निर्णयाचा जोरदार निषेध केला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, “जगभरात लोक आपली संस्कृती आणि धर्म इतरांना दाखवण्यासाठी आमंत्रित करतात, मात्र येथे उलट वातावरण तयार केले जात आहे. शातील अनेक मंदिरे आणि कावड यात्रांचे व्यवस्थापन व बांधकाम बिगर-हिंदू बांधवांनीही केले आहे.अशा प्रकारचे निर्बंध लादून भाजप कोणत्या विचारसरणीकडे नेऊ पाहत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सरकारने असे निर्बंध लादण्याऐवजी आपली संस्कृती सर्वांसाठी खुली ठेवायला हवी, असे मत रावत यांनी व्यक्त केले आहे.
१. केदारनाथ धाम २. बद्रीनाथ धाम ३. तुंगनाथ येथील श्री तुंगनाथ मंदिर ४. बद्रीनाथ येथील माता मूर्ती मंदिर ५. बद्रीनाथ येथील ब्रह्म कपाल शिला आणि परिक्रमा संकुल ६. सुभेन येथील भविष्य बद्री मंदिर ७. बद्रीनाथ येथे ताप कुंड (तलाव आणि गरम पाण्याचे झरे) ८. जोशीमठ येथील नरसिंह मंदिर ९. उरगाम येथील ध्यान बद्री मंदिर १०. मध्यमहेश्वर येथील श्री मध्यमहेश्वर मंदिर
११. गुप्तकाशी येथील श्री विश्वनाथजी मंदिर १२. पांडुकेश्वर येथील योग बद्री मंदिर १३. गौरीकुंड येथील श्री गौरी मैया मंदिर १४. बद्रीनाथ येथील श्री आदि केदारेश्वर मंदिर १५. ज्योतिरेश्वर येथील महादेव मंदिर १६. अनिमठ येथील वृद्ध बद्री मंदिर १७. बद्रीनाथ पुरीतील पंच शिला १८. बद्रीनाथ पुरीतील पंचधारा १९. केदारनाथ मंदिर संकुलातील छोटी मंदिरे २०. गुप्तकाशी येथील श्री विश्वनाथ मंदिर परिसरातील लहान मंदिरे
२१. ओंकारेश्वर मंदिर २२. त्रियुगीनारायण येथील श्री त्रियुगीनारायण मंदिर २३. कालीशिला येथील श्री कालीशिला मंदिर २४. वसुंधरा २५. वसुंधरा धबधब्याच्या खाली धर्मशिला २६. केदारनाथमधील उदक कुंड २७. उखीमठ येथील श्री उषा देवी मंदिर २८. उखीमठ येथील श्री बाराही देवी मंदिर २८. बद्रीनाथ येथील श्री वल्लभाचार्य मंदिर ३०. विष्णुप्रयाग येथील नारायण मंदिर
३१. सीता देवी मंदिर ३२. पाखी येथील श्री नरसिंग मंदिर ३३. दरमी येथील श्री नरसिंग मंदिर ३४. नंदप्रयाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ३५. कुलसारी येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ३६. द्वारहाट (अलमोडा) येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ३७. गुडरी (अलमोडा) येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ३८. कालीमठ येथील श्री महाकाली मंदिर ३९. कालीमठ येथील श्री महालक्ष्मी मंदिर ४०. कालीमठ येथील श्री महासरस्वती मंदिर
४१. जोशीमठ येथील श्री दुर्गा मंदिर ४२. ज्योतिरेश्वर येथील भक्तवत्सल मंदिर ४३. केदारनाथ येथील माता पार्वती मंदिर ४४. केदारनाथ येथील ईशानेश्वर मंदिर ४५. केदारनाथ जी मंदिरातील गणेश मंदिर ४६. केदारनाथमधील हंसा कुंड ४७. केदारनाथमधील रेतास कुंड ४८. केदारनाथमधील शंकराचार्य समाधी / श्री भैरवनाथ मंदिर






