संग्रहित फोटो
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर वसंत मोरे यांनी मतदानाच्या आकडेवारीबाबत संशय व्यक्त केला होता. मतदानानंतर दिलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीवेळी जाहीर झालेल्या मतांमध्ये तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसवर थेट आरोप
सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रशांत जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले. “प्रशांत जगताप यांनी भाजपशी हातमिळवणी करून माझा पराभव घडवून आणला,” असा दावा मोरे यांनी केला आहे. मोरे यांच्या म्हणण्यानुसार, “माझ्या प्रभागात काँग्रेसला एक जागा सोडलेली असताना देखील जगताप यांनी पाच काँग्रेस उमेदवार दिले. आघाडी असूनही असे का केले, याबाबत मी सातत्याने त्यांना आणि शहराध्यक्षांना सांगत होतो.”
हे सुद्धा वाचा : अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर; मुंबईत होणार पक्षप्रवेश
वसंत मोरे यांना जगताप यांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी वसंत मोरे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “वसंत मोरे हे सोशल मीडियावर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले नेते आहेत. अशा नेत्याचा भाजपच्या नवख्या कार्यकर्त्याने पराभव केला. यावर त्यांनी आत्मचिंतन करायला हवे. मी, अरविंद शिंदे किंवा कॉंग्रेसने वसंत मोरे यांच्या विरोधात कोणताही उमेदवार दिलेला नाही, असा खुलासाही प्रशांत जगताप यांनी केला.






