कोण आहे दुलारी देवी? ज्यांनी बनवलेली साडी नेसून निर्मला सीताराण सादर करणार अर्थसंकल्प
Budget Live : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तीसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे बिहारच्या जनतेला खूश करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान आज सीतारामण साडी नेसून पहिल्यांदाच हे सूचित केलं आहे. त्या साडीची खूप चर्चा होत आहे. मिथिला पेंटिंग असलेलीही साडी आहे.
Union Budget 2025: अर्थसंकल्पात मध्यम वर्ग, तरूणांना काय मिळणार?
जेडीयूचे राज्यसभा खासदार आणि त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, अर्थमंत्र्यांनी अलिकडेच बिहारला भेट दिली तेव्हा त्यांनी मधुबनीतील सौरथ येथील मिथिला पेंटिंग इन्स्टिट्यूटलाही भेट दिली. यावेळी प्रसिद्ध कलाकार दुलारी देवी यांनी या शैलीतील साडी त्यांना भेट दिली होती, त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.
बिहारसाठी चांगले संकेत
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मथिला पेंटिंग असलेली साडी नेसून आगामी काळात निवडणूक विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या बिहारला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, त्यांच्या साडीवरील मिथिला पेंटिंगमध्ये सुपारी, मखाना आणि मत्स सारखे नक्षिकाम केलेलं आहे. या तीनही गोष्टी मिथिलाची ओळख आहेत. कोणत्याही चांगल्या कार्यक्राची सुरुवात यापासून केली जाते.
दुलारी देवी कोण आहे?
दुलारी देवी या मिथिला चित्रकलेच्या एक प्रसिद्ध कलाकार आहेत. २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे. त्या बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील रांती गावच्या रहिवाशी आहेत. मधुबनीने मिथिला चित्रकलेच्या क्षेत्राता त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकार दिले आहेत. त्यामध्ये महासुंदरी देवी, गोदावरी दत्त, बौआ देवी अशी नावे आहेत. त्यांना पद्म पुरस्कारांनेही सन्मानित करण्यात आलं आहे.
दुलारी देवी यांचा जन्म एका मच्छीमार कुटुंबात झाला. त्यांच्या घरी वाचन-लेखनाची सोय नव्हती. त्यांचं लग्न कमी वयात झालं. मुले झाली. पतीच्या टोमण्यांना कंटाळून त्यांनी सोडचिठ्ठी घेतली. त्यानंतर, त्या शेतात मजूर म्हणून काम करू लागल्या. धुणीभांडी, झाडलोटची कामे करू लागल्या. यातून त्या उदरनिर्वाह करत असत. प्रसिद्ध मिथिला चित्रकार करपुरी देवी यांच्या घरीही त्या काम करत होत्या. इथूनच त्यांना मिथिला चित्रकला शिकण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर त्यांनी महासुंदरी देवीकडून प्रशिक्षण घेतले.