नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Delhi Liquor Policy Scam) आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली गेली. आता आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची चौकशी केली जाणार आहे.
CBI summons Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal on April 16 to question him in the excise policy case. pic.twitter.com/jlStNKhU2Y
— ANI (@ANI) April 14, 2023
अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता बोलावले आहे. अबकारी धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया अटकेत आहेत. ईडी आणि सीबीआयने त्यांच्यावर यापूर्वीच कारवाई केली आहे. आता केजरीवाल यांच्या अडचणींमध्येही वाढ होणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी ईडीवर आरोप केले आहेत.अबकारी धोरण प्रकरणी खोटे पुरावे गोळा करून भ्रम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी लोकांना त्रास देऊन त्यांच्यावर दबाव टाकून खोटी स्टेटमेंट घेत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.