न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली (फोटो - टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: भारतात न्यायव्यवस्था ही देशातील सर्वांसाठी एक मोठी व्यवस्था आहे. आता त्या न्यायव्यवस्थेत काहीसे बदल करण्यात आले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या न्यायदेवतेच्या स्वरूपात मोठा बदल करण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवर असणारी काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. तसेच ज्या हाती तलवार दिसायची, त्या ठिकाणी आता भारताचे संविधान असणार आहे. ब्रिटिश कायद्यात बदल करण्यात आले आहेत.
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रयत्न केले होते. भारतीय न्यायव्यवस्थेने आता ब्रिटिश काळातील परंपरा मागे टाकून नवीन पद्धती स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. काही दिवस आधी ब्रिटिश कायद्यात बदल देखील करण्यात आले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत. आधी मूर्तीच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असायची. तर तिच्या एका हातात तराजू आणि एका हातात तलवार असायची. मात्र आता त्या मूर्तीवरील काळी पट्टी हटवली गेली आहे. तराजू आणि तलवार ऐवजी आता न्यायदेवतेच्या हातात संविधानाची प्रत दिसून येत आहे.