उत्तराखंडमध्ये ढगफुटी (फोटो - सोशल मीडिया)
१. उत्तराखंड राज्यात निसर्गाचा प्रकोप
२. चामोली व रुद्रप्रयागमध्ये ढगफुटी
३. २ नागरिक बेपत्ता व जनावरे ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज
Heavy Rainfall In Uttarakhand: गेल्या काही दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान उत्तरखंडच्या रुद्रप्रयाग-चमोली येथे ढगफुटी झाली आहे. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपासून उत्तराखंड राज्यात निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.
जनपद रुद्रप्रयाग के तहसील बसुकेदार क्षेत्र के अंतर्गत बड़ेथ डुंगर तोक और जनपद चमोली के देवाल क्षेत्र में बादल फटने के कारण मलबा आने से कुछ परिवारों के फंसे होने का दुःखद समाचार प्राप्त हुआ है। स्थानीय प्रशासन द्वारा राहत और बचाव कार्य युद्धस्तर पर जारी है, इस संबंध में निरंतर…
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 29, 2025
उत्तराखंडमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. ढगफूटीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चमोली येथून दोन नागरिक बेपत्ता झाल्याचे देखील समजते आहे. अनेक जनावरे देखील ढीगाऱ्याखाली अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे खूळ मोठ्या प्रमाणात चिखल आणि डोंगराचा भाग खाली वाहून आला आहे. त्यामध्ये अनेक जनावरे माणसे अडकली असण्याची शक्यता आहे. एक गोशाळा देखील या ढीगऱ्याखाली आल्याची शक्यता आहे. ज्यात 15 ते 20 जनावरे अडकली असण्याचा अंदाज आहे. याबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांची पोस्ट काय?
उतररखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बासुकेदार भागात आणि चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे ढिगारा वाहून आला आहे. त्यात काही कुटुंबे अडकली असल्याची माहिती मिळाली. स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर करत आहे. मी संबंधित यंत्रणेच्या संपर्कात आहे. त्यांना आवश्यक त्या सूचना मी दिल्या आहेत. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी बाबा केदार यांच्याकडे प्रार्थना करतो.
गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यात जम्मू-काश्मीरमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसाने कहर केला. या पावसाचा फटका श्री माता वैष्णोदेवी यात्रा मार्गाला बसला आहे. या मार्गावरील अर्धकुंवारी भागात भूस्खलन झाले. तर दोडा येथे ढगफुटीमुळे एकूण 30 जणांचा मृत्यू झाला.
कटरा येथे नऊ आणि दोडा येथे चार भाविकांचा मृत्यू झाला. तर यात्रा मार्गावर भूस्खलनामुळे 22 भाविक जखमी झाले आहेत. रियासीचे पोलिस अधिकारी परमवीर सिंह यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, जम्मूमधील चेनानी नाल्यात एक कार पडल्याने तीन भाविक वाहून गेले आहेत. बेपत्ता झालेल्या तीन भाविकांपैकी दोन भाविक राजस्थानमधील धोलपूर येथील आहेत आणि एक आग्रा येथील आहे’.