पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग, परत आणण्यासाठी वचनबद्ध; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचं विधान

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडून सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख करत एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकव्याप्त काश्मिरबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडून सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख करत एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकव्याप्त काश्मिरबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. पाकव्याप्त काश्मिरबाबत मोदी सरकारच्या वचनबद्धतेबाबत जयशंकर यांनी भाष्य केले.

    परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मिरसंदर्भात पाकिस्तानला कडक इशारा दिला. पीओके भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असून, तो भारतात परत आला पाहिजे. यावर संसदेचा प्रस्ताव आहे आणि सर्व राजकीय पक्ष यासाठी वचनबद्ध आहेत. लोकांनी हे मान्यच केले होते की कलम 370 बदलता येणार नाही आणि हे स्वीकारले होते. पण एकदा आपण ते बदलले की संपूर्ण वास्तविकता बदलली.

    दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरबाबत संसदेत प्रस्ताव आहे. 10 वर्षांपूर्वी किंवा 5 वर्षांपूर्वीही लोक आम्हाला याबाबतीत विचारत नव्हते. पण जेव्हा आम्ही 370 रद्द केले. तेव्हा समजले लोकांना की पाकव्याप्त काश्मीर देखील महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले.