सौदी अरेबियाचा इराणमध्ये दुहेरी खेळ; मैत्रीचे नाटक करत, ट्रम्पला दिले हल्ला करण्याचे संकेत दिले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Saudi Arabia double game Iran US attack : मध्यपूर्वेतील राजकारण हे नेहमीच ‘धुर्त’ खेळींसाठी ओळखले जाते, पण सध्या सौदी अरेबियाने (Saudi Arabia) जे धोरण स्वीकारले आहे, त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सौदीचे सामर्थ्यवान युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) हे जगासमोर इराणसोबतच्या संबंधांत ‘नवा अध्याय’ सुरू करत असल्याचे भासवत आहेत. मात्र, अॅक्सिओस (Axios) या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या एका खळबळजनक अहवालानुसार, सौदीचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान (KBS) यांनी अमेरिकेत जाऊन वेगळीच खेळी खेळली आहे.
प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी नुकतीच वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांची भेट घेतली. या गुप्त बैठकीत खालिद यांनी स्पष्ट केले की, इराण सध्या अमेरिकेच्या दबावाखाली आहे, पण जर ट्रम्प प्रशासनाने आता लष्करी कारवाई केली नाही, तर इराण याला आपला विजय मानेल. “अमेरिकेने माघार घेतल्यास इराणी राजवट अधिक मुजोर होईल,” असे विधान त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS :भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’! डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी 11 देशांची मोठी तटबंदी; ट्रम्प यांच्या धमकीला मोदींचे ‘डिजिटल’ उत्तर
सौदी अरेबियाच्या या धोरणाला तज्ज्ञ ‘गुड कॉप, बॅड कॉप’ (Good Cop, Bad Cop) धोरण मानत आहेत. १. मोहम्मद बिन सलमान (MBS): यांनी काही दिवसांपूर्वीच इराणी राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा केली. त्यांनी आश्वासन दिले की, “सौदी अरेबिया इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो आणि इराणविरुद्धच्या कोणत्याही लष्करी कारवाईसाठी आपले हवाई क्षेत्र (Airspace) वापरू देणार नाही.” २. प्रिन्स खालिद (KBS): मात्र, अमेरिकेतील थिंक टँक आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत बोलताना खालिद यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर आणि प्रादेशिक प्रभावावर प्रहार करण्याची गरज अधोरेखित केली.
Saudi Defense Minister Prince Khalid bin Salman said in an hour-long private briefing with Middle East think-tank experts and representatives from several Jewish organizations in Washington on Friday, that if President Donald J. Trump doesn’t follow through on his threats against… pic.twitter.com/tkdm9Va8Su — OSINTdefender (@sentdefender) January 31, 2026
credit – social media and Twitter
डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाती देशांमध्ये आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. ट्रम्प यांनी इराणला ‘परमाणु निःशस्त्रीकरण’ (Nuclear Disarmament) करारावर स्वाक्षरी करण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. सौदी अरेबियाला भीती आहे की, जर अमेरिकेने थेट हल्ला केला तर इराण सौदीच्या तेल विहिरींवर (Oil Refineries) प्रतिहल्ला करू शकतो. त्यामुळेच, सौदी अरेबिया सार्वजनिकरीत्या शांततेची बाजू घेत आहे जेणेकरून इराणला राग येऊ नये, पण खासगीत अमेरिकेला इराणचा काटा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Crisis: ‘आमचं डोकं झुकलेलं होतं!’ शाहबाज शरीफ यांच्या अब्रूची राखरांगोळी; कोणासमोर भीक मागितल्याची दिली कबुली?
इराणने आधीच इशारा दिला आहे की, जर त्यांच्यावर हल्ला झाला तर ते सौदी आणि यूएईमधील अमेरिकन दूतावासांना लक्ष्य करतील. अशा परिस्थितीत सौदी अरेबियाची ही दुहेरी चाल अत्यंत धोकादायक ठरू शकते. एकीकडे शांततेचे नाटक आणि दुसरीकडे युद्धाची तयारी, यामुळे इराण आणि सौदीमधील २०१३ नंतर सुधारलेले संबंध पुन्हा एकदा संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
Ans: सौदीचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद यांनी अमेरिकेला सांगितले आहे की, इराणवर आता कारवाई न केल्यास ते भविष्यात अधिक धोकादायक ठरतील.
Ans: युवराज MBS यांनी इराणला सांगितले की सौदी आपले हवाई क्षेत्र किंवा जमीन इराणवरील हल्ल्यासाठी वापरू देणार नाही.
Ans: हा अहवाल सुचवतो की सौदी अरेबिया सार्वजनिकरीत्या शांततेचा पुरस्कार करत असला तरी, खासगीत इराणची शक्ती कमी करण्यासाठी अमेरिकेच्या लष्करी कारवाईला पाठिंबा देत आहे.






