Photo Credit- Social Media पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत अतिरिक्त टॅरिफविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे (फोटो - सोशल मीडिया)
दिल्ली : भारताचा रुपया आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घसरतो आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पुन्हा एकदा घसरला आहे. रुपयाच्या या घटत्या किंमतीमुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी कॉंग्रेस सरकार असताना नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. 2013 मध्ये नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर डॉलरच्या मानामध्ये रुपया घसरत असल्यामुळे टीका केली होती. यूपीए सरकारच्या नेतृत्वावर टीका करताना ते दिशाहीन झाले असून त्यांना ना देशाच्या रक्षणाची चिंता आहे न घसरणाऱ्या रुपयाच्या किंमतीची, त्यांना फक्त आपली खुर्ची टिकवून ठेवण्याची चिंता आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी तेव्हा केली होती.
रुपया घसरल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच या 2013 च्या विधानाची आठवण करुन दिली आहे. यासाठी कॉंग्रेस नेते ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी कॉंग्रेस सरकार व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. यामुळे आता कॉंग्रेस नेते एनडीए सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन निशाणा साधला आहे. जयराम रमेश म्हणाले की, २०१४ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीविरुद्ध गुजरातच्या तत्कालीन नॉन-बायोलॉजिकल गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी जोरदार मोहीम राबवली होती, राजकीय फायदा मिळवण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर वैयक्तिक हल्लेही केले होते. 16 मे 2014 रोजी रुपया 58.58 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. दहा वर्षांनंतर, रुपया 85.27 प्रति डॉलर या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणारे चलन म्हणून भारतीय रुपयाचा मान मिळवला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लक्षात ठेवा की हे सर्व अवमूल्यन सरकार आणि आरबीआयच्या वास्तविक चलनाच्या दराच्या पलीकडे आहे – जसे पंतप्रधानांच्या माजी मुख्य आर्थिक सल्लागारांनी अलिकडच्या आठवड्यात निदर्शनास आणून दिले आहे. आरबीआयने रुपया स्थिर करण्यासाठी आपल्या परकीय चलन साठ्यातील अब्जावधी डॉलर्स वापरले आहेत, परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. किती अब्ज डॉलर्स वापरले गेले आहेत? असा सवाल जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.
The then-biological CM of Gujarat had run a loud campaign against the depreciation of the rupee vis-a-vis the dollar in 2014, even resorting to personal attacks on Prime Minister Manmohan Singh to score political points. On 16 May, 2014, the rupee closed at Rs 58.58 per USD. Ten…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 30, 2024
पुढे त्यांनी लिहिले आहे की नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांकडे आता शब्द नाहीत, पण आपण त्यांना 2013 मधील त्यांचे शब्द आठवूया -“संकट येतात, पण जर संकटाच्या काळात नेतृत्व दिशाहीन, निराश असेल, तर संकट खूप गंभीर बनते… हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की दिल्लीतील राज्यकर्त्यांना ना देशाच्या संरक्षणाची चिंता आहे ना रुपयाच्या घसरत्या मूल्याची… जर त्यांना काळजी असेल तर ती फक्त त्यांची खुर्ची वाचवण्याची आहे” अशी पोस्ट कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी लिहिली आहे.