
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मानहानीच्या एका प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल (Premkumar Dhumal) यांची माफी मागितली आहे. जयराम रमेश यांनी धुमल यांच्या घरी जाऊन त्यांची लेखी माफी मागितली.
शिमला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मानहानीच्या एका प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल (Premkumar Dhumal) यांची माफी मागितली आहे. जयराम रमेश यांनी धुमल यांच्या घरी जाऊन त्यांची लेखी माफी मागितली.
याबाबतचा खटला हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये विचाराधीन आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार सांगितले. धुमल यांनी सांगितले की, सुमारे 10 दिवसांपूर्वी मानहानीच्या प्रकरणाची सुनावणी हिमाचल हायकोर्टामध्ये होती. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी हायकोर्टामध्ये मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जयराम रमेश हमीरपूर येथे आले. तिथे झालेल्या भेटीवेळी जयराम रमेश यांनी त्यांनी केलेल्या विधानांबाबत माफी मागितली.
तसेच मी जे काही आरोप केले ते सर्व निराधार असल्याचे सांगितले. त्यांनी माफी मागताना यापुढे त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही, असे मला सांगितले.